फक्त २० रुपयांत सगळं घर होईल एकदम स्वच्छ- चकाचक, ते ही कमी मेहनतीत.. कसं?? पाहा ८ भन्नाट उपाय
Updated:September 19, 2023 15:35 IST2023-09-19T15:22:09+5:302023-09-19T15:35:23+5:30

१. सणासुदीचे दिवस आहेत. सगळं घर घासून- पुसून अगदी लख्खं करायचं असेल तर ते फक्त २० रुपयांत कसं करता येईल ते आता पाहूया... शिवाय घराच्या स्वच्छतेसाठी खूप मेहनत घेण्याचीही गरज नाही.
२. हा उपाय करण्यासाठी बाजारातून फक्त कोल्ड्रिंकची छोटीशी अगदी २० रुपयांत मिळणारी बॉटल विकत आणा. मग बघा घराच्या खिडक्यांपासून ते स्वयंपाक घरातल्या तेलकट डागांपर्यंत आणि गंजलेल्या नळांपासून ते बाथरुमच्या टाईल्सपर्यंत सगळं घर कसं अगदी चकाचक होतं...
३. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जर केसांना च्युईंगम लागलं असेल तर एका वाटीत कोल्ड्रिंक घ्या आणि केसांचा तो भाग त्यात काही वेळ बुडवून ठेवा. च्युईंगम अगदी अलगदपणे निघून जाईल.
४. टुथपेस्ट आणि कोल्ड्रिंक सम प्रमाणात घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये एकत्र करा. हे मिश्रण भुरकट झालेले, पांढरे पडलेले नळ स्वच्छ करण्यासाठी वापरता येतं. नळ अगदी नव्यासारखे चकचकीत होतील.
५. कोल्ड्रिंक आणि व्हाईट व्हिनेगर यांच्या मदतीने खिडक्यांच्या काचा तसेच घरातले आरसे स्वच्छ करता येतात. यासाठी फक्त हे मिश्रण आरशांवर, खिडक्यांवर मारा आणि नंतर पुसून घ्या. अजिबात घासण्याची गरज नाही.
६. कोल्ड्रिंक आणि डिशवॉश लिक्विड सम प्रमाणात घ्या. स्वयंपाक घरातल्या चिकट झालेल्या फरशा स्वच्छ करण्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे.
७. फरशी किंवा भिंतींना पडलेले काळे डाग काढून टाकण्यासाठी कोल्ड्रिंक आणि डिटर्जंट पावडरचं मिश्रण वापरून पाहा. छान चमकतील फरशा.
८. कोल्ड्रिंक आणि डिटर्जंट पावडर हे मिश्रण टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आणि तिथली दुर्गंधी घालविण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.
९. एखाद्या भांड्याच्या तळाला बोअरिंगच्या पाण्यामुळे पांढरे डाग पडले असतील, तर त्या भांड्यात कोल्ड्रिंक घाला आणि ४ ते ५ मिनिटे उकळू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने भांडे धुवून घ्या.