Join us   

गोलकीपर होणं सोपं काम नाही, कुटुंब सोबत होतं म्हणून! -श्रीजेश सांगतो, हरलो - रडलो तेव्हाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2024 5:08 PM

1 / 6
भारतासाठी शेवटचा सामना खेळताना मारलेला प्रत्येक फटका, घेतलेली प्रत्येक झेप आणि प्रेक्षकांचे ऐकू येणारे उत्साहपूर्ण आवाज, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये संघाला मिळालेलं कास्यं पदक हे सगळं मनात साठवून घेतलं. निवृत्ती घेतल्याने खेळ थांबला पण आता या सगळ्या आठवणींचा खेळ सुरू झाला आहे, १८ वर्षांपुर्वी मी तरुण खेळाडू होतो. तेव्हापासून ते आज भारताच्या अभिमानाचे संरक्षण करणारा पुरुष इथपर्यंत झालेला माझा प्रवास अविस्मरणीय आहे, अशा शब्दांत भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश याने त्याच्या भावना व्यक्त केल्या..
2 / 6
श्रीजेश हा भारतीय हॉकी संघाचा आधारस्तंभ म्हणून मागच्या कित्येक वर्षांपासून खेळत आहे. हॉकीमधला वॉल ऑफ इंडिया अशी त्याची ओळख झाली ती काही उगाच नाही. त्याच्या उपस्थितीत भारतीय संघाने आजवर दोन ऑलिम्पिक पदकं पटकाविली. श्रीजेशला मैदान सोडणं जेवढं कठीण होतं, तेवढंच कठीण त्याच्या चाहत्यांनाही होतं.
3 / 6
श्रीजेश जबरदस्त खेळाडू तर आहेच. पण तो एक कम्प्लिट फॅमिली मॅन म्हणून ओळखला जातो. खेळानंतरचा वेळ कुटूंबासाठी देणं त्याला सगळ्यात जास्त आवडतं. त्याचं लव्ह मॅरेज. कॉलेजमध्ये असताना त्यांची ओळख झाली. त्याची बायको अनिशा ही आयुर्वेदिक डॉक्टर असून तिने तिचं करिअर उत्तम पद्धतीने घडवावं, असं श्रीजेशला नेहमीच वाटतं.
4 / 6
अनिशा म्हणते की मी त्याला जेव्हापासून ओळखते तेव्हापासून आजपर्यंत तो खेळतोच आहे. एक खेळाडू म्हणूनच मला तो माहिती आहे. आता निवृत्तीनंतर त्याच्याकडे नेमकं कसं पाहावं, हे समजत नाही, असं ती गमतीने म्हणाली...
5 / 6
लेकाचा जबरदस्त खेळ पाहून त्याचे आईवडील नेहमीच आनंदून जायचे.. खेळामुळे त्याला जास्तीतजास्त दिवस घराबाहेर राहावं लागायचं. त्यामुळे ते कधीकधी खंतावून जायचे. म्हणूनच तर श्रीजेशच्या निवृत्तीनंतर आज त्याचे आईवडील म्हणतात की मागच्या २० वर्षांपासून आम्ही त्याला टीव्हीवरच जास्त पाहात आलो आहोत. त्यामुळे आम्हाला तर तो ओणमच्या दिवशी आपल्या प्रजाजनांना भेट देणारा बळीराजाच वाटतो. आता निवृत्तीनंतर मात्र त्याचा पुरेपूर सहवास मिळेल, हा आनंदही त्यांना आहेच..
6 / 6
श्रीजेश म्हणतो निवृत्तीचा निर्णय घेणं कठीण असतं. पण कधी ना कधी ती घ्यावी लागणारचं. म्हणूनच तो निर्णय योग्य वेळी घेणं कधीही चांगलं. योग्य वेळ साधता आल्याने तो निर्णय उजळून निघतो.. त्यामुळेच मी निवृत्तीच्या निर्णयावर ठाम असून रिकाम्या हाताने परतण्यापेक्षा ऑलिम्पिकचे ब्राँझ पदक खूप चांगले..
टॅग्स : पॅरिस ऑलिम्पिक २०२४हॉकी