भारतातला पहिला ट्रान्समॅन प्रेग्नंट; लवकरच मूल होणार, पाहा ट्रान्सजेंडर जोडप्याचे व्हायरल फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 10:37 AM 1 / 6केरळचे ट्रांसजेंडर कपल जिया आणि जाहादनं सोशल मीडियावर आपल्या प्रग्नेंसीची घोषणा केली. या जोडप्यानं इंस्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत. कोझीकोड मेडीकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या टिमचं म्हणणं आहे की या जोडप्यांची गर्भधारणा करण्यात कोणतंही आव्हान नाही. दोघांनीही लिंग परिवर्तन केले आहे. (Transgender couple from kerala gave the good news of pregnancy shared the post on social media)2 / 6जिया आणि जहाद हे दोघे गेल्या ३ वर्षांपासून एकत्र राहत आहेत. जिया पुरुष म्हणून जन्माला आली आणि स्त्री बनली. जहाद स्त्री म्हणून जन्माला आला आणि पुरुषात बदलला. या जोडप्याने मिल्क बँकेतून बाळाला आईचे दूध पाजण्याचा निर्णय घेतला.3 / 6भारतातील मुलाला जन्म देणारा जहाद हा पहिला ट्रान्समॅन असेल, असा दावा आता केला जात आहे. 4 / 6 हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान जहादचे स्तन काढण्यात आले होते. तिचे गर्भाशय आणि इतर काही अवयव काढले गेले नाहीत. यामुळे त्यांना आता गर्भधारणा करता आली आहे.5 / 6जियाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, 'मी जन्माने किंवा माझ्या शरीराने स्त्री नाही. माझ्या आत एक स्त्री होती. मलाही मूल होईल आणि तो मला 'आई' म्हणेल, असे त्याचे स्वप्न होते.6 / 6मनोरमामधील रिपोर्टनुसार, या जोडप्याने आधी एक मूल दत्तक घेण्याची योजना आखली होती. तसेच संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतली. परंतु कायदेशीर कारवाई त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक होती, कारण ते एक ट्रान्सजेंडर जोडपे होते. सध्या यांचे फोटोशूट तुफान व्हायरल होत आहे. (Image Credit- Social Media, Instagram, Ziya Paval) आणखी वाचा Subscribe to Notifications