आज फिर जिने की तमन्ना है! हिंदी सिनेमाच्या रुपेरी पडद्यावरचं अव्वल नाव-वहिदा रहमान.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 4:31 PM 1 / 7'आज फिर जिने की तमन्ना है' म्हणत ६० चं दशक गाजवणाऱ्या, ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान आजही चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे. त्यांचा जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट गावात ३ फेब्रुवारी १९३८ला झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात तमिळ व तेलुगू चित्रपटातून केलं. मात्र, त्यांना खरी ओळख हिंदी चित्रपटातील अभिनयामुळे मिळाली. अभिनयाच्या सुवर्ण कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतंच त्यांची यंदाच्या ५३ व्या प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे(Interesting Facts About Waheeda Rehman The Epitome Of Beauty).2 / 7वहिदा रहमान याचं सिनेसृष्टीत ५ दशकांचं योगदान आहे. याआधी वहिदा रेहमान यांना पद्मभूषण, राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून ते रंगीत दुनियेपर्यंत वहिदा रहमान यांनी विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. इतकंच नाही तर, वहिदा यांनी १९६४ ते १९६९ या काळात हिंदी सिनेसृष्टीती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असा त्यांचा नावलौकिक आहे.3 / 7वहिदा यांना अभिनयासह भरतनाट्यमची देखील आवड होती. त्यांना एक उत्तम नर्तक व्हायचे होते. त्यांनी ही आवड आपल्या वडिलांना बोलून दाखवली. वडिल वहिदाला गुरुजींकडे घेऊन गेले. मात्र, गुरुजींनी वहिदा मुस्लिम असल्याचं सांगत, नृत्य शिकवण्यास नकार दिला. त्यानंतर गुरुजींनी वाहिदाची त्यांच्या एका मित्राकडून जन्मकुंडली काढली. त्यानंतर तिला नृत्य शिकवण्यास होकार दिला.4 / 7वहिदा यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गच कलाकारांसोबत काम केलं आहे. त्यांची बॉलीवूडमध्ये एन्ट्री दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता गुरुदत्त यांच्यामुळे झाली. गुरुदत्त यांनी वहिदाला एका साऊथ चित्रपटात पाहिले होते. पाहताक्षणी गुरुदत्त त्यांच्या प्रेमात पडले. वहिदा यांच्या सौंदर्यावर ते खूप मोहित झाले होते. त्याचक्षणी गुरुदत यांनी वहिदाला बॉलीवूडमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. 5 / 7गुरु दत्त यांनी वहिदाला 'सीआयडी' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. 'सीआयडी' या चित्रपटानंतर त्यांनी गुरुदत्तसोबत बरेच चित्रपटात काम केले. यशाचे शिखर गाठत असताना, वहिदा यांचे नाव गुरुदत्तसोबत जोडले गेले. काही दिवसात याचं अफेअर सुरु असल्याच्या चर्चा व्हायरल झाल्या. पण आधीच विवाहित आणि मुलं असलेल्या गुरु दत्तला वहिदासोबत राहणं कठीण होतं.6 / 7गुरुदत्त यांच्या घरी समजताच त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यामुळे वहिदा यांनी गुरुदत्तसोबत असलेले नाते संपुष्टात आणले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यामुळे वहिदा चर्चेत आल्या होत्या. 'कौन बनेगा करोडपती १४' च्या एका भागात स्पर्धकाने त्यांना सेलिब्रिटी क्रशबद्दल विचारले. त्यावेळी त्यांनी जया, रेखा यांचं नाव न घेता अभिनेत्री वहिदा रहमान यांचे नाव घेतले होते. अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री वहीदा रहमान असून, त्यांनी अनेक चित्रपटात बिग बींच्या आईची भूमिका साकारली आहे.7 / 7एप्रिल १९७४ साली वहिदा यांनी शशी रेखा यांच्यासह लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले असून, सोहेल रेखी आणि काशवी रेखी, दोघेही लेखक आहेत. त्या लवकरच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हिरामंडी या वेब सिरीजमध्ये दिसणार असून, त्यांच्या दमदार कमबॅकची वाट चाहते पाहत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications