Join us   

International Tea Day : जगात सर्वात महाग चहा कोणता? पाहा जगातले महागडे ४ चहा; एक कप चहाची किंमत....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 11:31 AM

1 / 5
चहा म्हणजे अनेकांसाठी अमृतासारखा असतो. भारतात तर चहावेडे असणारे अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात. एक कप चहा अशी काय एनर्जी देऊन जातो की पुढे कितीतरी तास आपण उत्साहाने काम करु शकतो. ज्या चहाने आपली सकाळ होते तो चहा १० ते २० रुपयांपर्यंत असतो. पण जगभरात असे विविध प्रकारचे चहा मिळतात ज्यांची किंमत ऐकून आपण थक्क होऊ शकतो. पाहूयात जगातले असेच महागडे चहा (International Tea Day 4 Costliest Tea In The World)...
2 / 5
हा जगातील सर्वात महागडा चहा आहे जो चीनमध्ये आढळतो. या १ किलोच्या चहाची किंमत २,९०,८१३ रुपये इतकी आहे. सोन्यापेक्षा जास्त किमतीचा असलेला हा चहा कोण पीत असेल सांगता येत नाही.
3 / 5
हाही महाग चहांपैकी एक असून त्याचे पीकही चीनमध्येच घेतले जाते. हा अतिशय दुर्मिळ प्रकारचा पिवळा चहा आहे जो केवळ सिंगापूरमध्येच विकला जातो. या चहा पानांमध्ये खरं सोनं असल्याने त्या चहाची किंमतही सोन्यासारखीच आहे. वर्षातून एकदाच पीक घेतला जाणारा हा १ किलो चहा ७,७२,९४३ रुपयांना मिळतो. या चहाची कापणी करण्यासाठी सोन्याचीच कात्री वापरली जाते असे म्हणतात.
4 / 5
हा भारतात उत्पादन होणारा एक महागडा चहा आहे. दार्जिलिंगच्या हिरव्यागार डोंगरावर या चहाची लागवड केली जाते. आज या चहाच्या १ किलोची किंमत ४,३८,२०० रुपये इतकी आहे. हा चहा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.
5 / 5
हा जपानमधील एक महागडा चहा आहे. ग्रीन टी प्रकारात मोडणाऱ्या या चहाला जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यातील ग्योकुरो मिनामी हा १ किलो चहा १० लाख ७८ हजार रुपयांना मिळतो. हा चहा औषधी असल्याने त्याला बरीच मागणी असते. तसेच हा चहा उकळल्यानंतरही हिरव्याच रंगाचा दिसतो.
टॅग्स : सोशल व्हायरलअन्न