लग्नानंतर आडनाव बदलण्याची महिलांवर कायद्यानं सक्ती नाही ! ६ अभिनेत्री ज्या अभिमानानं माहेरचंच आडनाव लावतात.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2023 3:24 PM 1 / 8लग्नानंतर माहेरचे आडनाव सोडून सासरचे आडनाव लावणे हा पायंडा असला तरी तो काही नियम नाही. भारतीय कायदाही अशी कुठलीही सक्ती महिलांवर करत नाही. रेशन कार्ड ते पासपोर्ट की बँक कुठंही महिलेने लग्नानंतर आडनाव बदललेच पाहिजे असा कायदा नाही, की सक्ती नाही. अनेकजणी रीत म्हणून ते बदलतात. काहीजणी दोन्हीकडची आडनावं लावतात. तर काहीजणी आपले माहेरचे आडनावच कायम ठेवतात. हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. आणि आडनाव बदलले नाही म्हणून ना त्या नवराबायकोतले प्रेम कमी होते ना कुटुंब सुख. उलट आपल्या पत्नीच्या निर्णयाचा आदर करायला आता भारतीय पुरुषशी शिकत आहेत हा अतिशय आनंदाचा आणि स्वागतार्ह बदल आहे. अत्यंत नामवंत आणि लोकप्रिय आणि श्रीमंत अभिनेत्रींनीही अलीकडच्या काळात लग्नानंतर आपली आडनावं बदललेली नाहीत, हा ठळक सामाजिक बदलही महत्त्वाचा आहे(Bollywood Actress Does Not Use Husband Surname).2 / 8अनुष्का आणि विराट कोहलीचे लग्न झाले. त्यांना आता वामिका नावाची सुंदर लेक आहे. अनुष्काने आपले शर्मा आडनाव कायम ठेवले आहे. 3 / 8 बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचे लग्न गाजले. हे रोमॅण्टिक कपलही लोकप्रिय आहे. दीपिका पादुकोण आजही तेच नाव कागदोपत्री लावते.4 / 8आलियानेही आपले भट हेच आडनाव कायम ठेवले आहे.5 / 8कतरीना कैफ आणि विकी कौशल हे अलीकडेच विवाहबद्द झाले आहेत. कतरीनाने लग्नांनंतर आपले आडनाव बदलले नाही. 6 / 8सिद्धार्थ रॉय कपूरशी विद्या बालनने लग्नगाठ बांधली, त्याला अनेक वर्षे झाली. आजही विद्या बालन म्हणूनच ओळखली जाते.7 / 8राणी मुखर्जी यांनी सुप्रसिद्ध फिल्ममेकर आदित्य चोपडा यांच्याशी विवाह केला आहे. लग्नानंतरही राणी आपले आडनाव मुखर्जी असेच लावते. 8 / 8बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची बायको आणि राजेश खन्ना, डिंपल कपाडियाची मुलगी ट्विंकल. ना डिंपलने आपले आडनाव बदलले ना ट्विंकलने. ही सारी जोडपी आपली केमिस्ट्री, रोमान्स, कुटूंब आणि करिअर उत्तम सांभाळत आहेत. हा बदल अतिशय वेगळा आणि ठाशीव आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications