1 / 5अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) या दोघांचाही २०२४ या वर्षासाठी 'मोस्ट ब्यूटीफूल व्हेजिटेरियन सेलिब्रिटीज' हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मुक्या प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या People for the Ethical Treatment of Animals (PETA) या संस्थेतर्फे दरवर्षी वेगन आहारशैली स्विकारणाऱ्या आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या सेलिब्रिटींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.2 / 5यापुर्वीही अनेक जणांनी हा पुरस्कार पटकावलेला आहे. मुक्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या संरक्षणासाठी सेलिब्रिटी जे काही कार्य सातत्याने करत असतात, त्या कार्याचा हा एकप्रकारे केलेला गौरव समजण्यात येतो आणि त्यांना त्यांच्या कार्यासाठी अधिक प्रोत्साहित करण्यात येते.3 / 5मागील काही वर्षांपासून जॅकलिन पेटातर्फे प्राण्यांच्या संरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होते. पेटातर्फे राबविण्यात आलेल्या #FreeGajraj या मोहिमेसाठीही तिने अनेक पद्धतींनी मदत केली होती. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना आश्रय द्या, यासाठी ती नेहमी ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेत असते.4 / 5रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया हे दोघेही मागील काही वर्षांपासून वेगन आहार घेत असून त्यांनी वेगन मीट कंपनीचीही सुरुवात केली आहे.5 / 5यापुर्वी झीनत अमान, जॅकी श्राॅफ, आलिया भट, अक्षय कुमार, भुमी पेडणेकर, श्रद्धा कपूर, सोनू सूद, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन, रेखा, अमिताभ बच्चन, शाहिद कपूर या सेलिब्रिटींनाही पेटातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.