Japanese girl mayo india love : व्वा! पिंगा घालणाऱ्या, मराठी बोलणाऱ्या जपानी पोरीची बात न्यारी; तिचं भारत प्रेम पाहून म्हणाल लय भारी Published:December 15, 2021 05:45 PM 2021-12-15T17:45:21+5:30 2021-12-15T18:01:54+5:30
Japanese girl mayo india love : जपानचं टोक्यो शहर नेहमीच चर्चेचा विषय असतं. सध्या सोशल मीडयावर जपानी तरूणी तुफान चर्चेत आहे. या तरूणीचं नाव मायो असून ती तिच्या भारत प्रेमामुळे लोकांच्या पसंतीस (Japanese Girl Mayo) उतरली आहे.
मायो एक जपानी मुलगी असूनही तिला हिंदी आणि मराठी भाषेबद्दल प्रचंड प्रेम वाटते. मायो खूप सुंदर आणि अर्थपूर्ण हिंदी बोलते. भारतीय संस्कृतीतील खाणं, पिणं, सण, उत्सवांबाबत तिला बरीच कल्पना आहे.
आपल्या युट्यूब चॅनेलमुळे मायोला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तिच्या चॅनेलचं नाव मायो जपान (Mayo Japan)असं आहे. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की माझ्या वडीलांना भारत खूप प्रिय होता. त्यांनी मला भारत फिरण्यासाठी आणि हिंदी शिकवण्याची प्रेरणा दिली.
मायो म्हणते की तारूण्यात माझे वडील भारतात अनेकदा यायचे. हिमायलातही ते अनेकदा गेले आहेत. त्यांनी मला सांगितलं भारतात प्रवास करण्यासाठी हिंदी शिकून घे. त्यानंतर मी हळूहळू हिंदी बोलणं आणि समजून घ्यायला सुरूवात केली. मायोनं ओसाका युनिव्हर्सिटीमध्ये चार वर्ष हिंदीचं शिक्षण घेतलं. भारतात राहून मायो इतर भाषासुद्धा शिकली आहे.
भारतीय खाद्य पदार्थांबाबत बोलायचं झालं तर मायोला पाणीपूरी आणि दही वडे प्रचंड आवडतात. तेच संस्कृतीच्या बाबतीत मायो सांगते की टोक्योमध्ये लोक बरेच शांत असतात. पण भारतात मात्र अनोखळी लोकांशीही बोलता येतं.
जपानी लोकांना जास्त बोलायला आवडत नाही पण भारतातल्या लोकांना जास्त बोलायला आवडतं. भारतात बाजार, ट्रेन सगळीकडे अनोळखी लोक एकमेकांशी बोलू लागतात.
मायो सांगते की जपानमध्ये अनेक देवी देवतांची पूजा केली जाते. ज्या देवीची पूजा केली जाते ती भारतातील सरस्वती देवी आहे. दोन्ही देशांच्या देवी देवता एक समान आहेत. दोन्ही देशांचे कल्चरही एक समान आहे.
हिंदी, मराठीसह मायो आता इतर भाषाही शिकून घेत आहे. तिचं म्हणणं आहे की यामुळे दोन देशातील लोक जवळ येऊ शकतील.
मायो यासाठी Mayo Japan यूट्यूब चॅनेल चालवते. या चॅनेलमध्ये ती जपानबाबतही अनेक गोष्टी सांगते.
याशिवाय भारतीयांना जपानी भाषासुद्धा शिकवते.
बीबीसीच्या मुलाखीत मायो सांगते की भारत माझ्या बॉयफ्रेंडप्रमाणे आहे भारतावर माझं खूप प्रेम आहे.
(Image Credit- mayo japan instagram)
(Image Credit- mayo japan instagram)
(Image Credit- mayo japan instagram)