1 / 7१. बॉलीवूड अभिनेत्रींनी करवा चौथ नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी केली. अंकिता लोखंडे, कतरिना कैफ, आलिया भट यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींची ही पहिलीच करवा चौथ असल्याने त्यांचा यावेळचा उत्साह बघण्यासारखा होता.2 / 7२. प्रत्येक सणवार उत्साहाने साजऱ्या करणाऱ्या अंकिता लोखंडेचा करवा चाैथचा थाटही बघण्यासारखा होता. यावेळी तिने नेसलेली नारंगी रंगाची भरजरी साडी आणि त्यावर तिने केलेला शिमरी मेकअप तिच्या सौंदर्याला चार चाँद लावणारा ठरला.3 / 7 ३. अंकिताप्रमाणेच अभिनेत्री कतरिना कैफ हिने देखील यावर्षी पहिल्यांदाच करवा चौथ साजरी केली. कतरिनाने खूप जास्त मेकअप केलेला नव्हता. पण तरीही ती अतिशय मोहक दिसत होती. तिची साडी खूप भरजरी नसली तरी हलके वर्क असणारी लाल- गुलाबी साडी आणि त्यावर हिरवे ब्लाऊज कतरिनाला अतिशय शोभून दिसत होते4 / 7४. मॉनी रॉय हिने करवा चौथनिमित्त काढलेल्या मेहेंदीची तर यंदा चांगलीच चर्चा होती. त्यानंतर तिचा करवा चाैथ स्पेशल लूकही गाजला. हलका अबोली किंवा पीच रंगाच्या तिच्या साडीवर गोल्डन थ्रेडवर्क केलेले होते.5 / 7५. अभिनेत्री प्रिटी झिंटा हिने मात्र पिवळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता आणि त्यावर तिने लाल ओढणी घेतली होती. ही ओढणी तिने डोक्याभोवती लपेटून घेतली होती. लाल भडक रंगाची ओढणी आणि त्यावर असलेले सोनेरी वर्क यामुळे तिचा चेहरा आणखीनच उजळून गेला होता.6 / 7६. सोनम कपूरही करवा चौथनिमित्त खूप छान सजली होती. तिची साऊथ इंडियन पॅटर्नची साडी तिला अतिशय शोभून दिसत होती. उपवास केला नाही तरी करवा चौथ मात्र छान सेलिब्रेट केली असं सोनम तिच्या पोस्टमध्ये म्हणते आहे. 7 / 7