Join us   

ट्रान्सजेंडर कपलच्या घरी हालला पाळणा, बारशाला घेतला मोठा निर्णय; बाळाचं नावही चर्चेत…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 1:13 PM

1 / 10
केरळमधील ट्रान्सजेंडर जोडपं, आपल्या प्रेग्नंसीच्या बात्म्यावरून इंटरनेटमध्ये खूप चर्चेत होते. त्याच तृतीयपंथीय कपलच्या घरी ८ फेब्रुवारी रोजी पाळणा हालला होता. त्या मुलाची सोशल मिडीयावर प्रचंड चर्चा झाली होती. ट्रान्सकपलने नुकतंच आंतरराष्ट्रीय महिला दिनी नवजात बाळाचं नामकरण केलं. त्यांच्या या दिमाखदार सोहळ्यात अनेक ट्रान्सजेंडर मंडळींनी हजेरी लावली होती(Kerala trans couple holds naming ceremony of baby on Women’s Day).
2 / 10
या ट्रान्सकपलने आपल्या मुलाचे नाव जबिया जहाद ठेवलं असून, बाळाच्या लिंगाबाबत अद्याप केणतीही माहिती दिली नाही. या सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
3 / 10
पहिल्यांदाच एका पुरुषाने बाळाला जन्म दिला, त्यामुळे त्याची जगभरात खूप चर्चा झाली. साहद भारतातील पहिला ट्रान्समॅन ठरला आहे. ज्याने एका मुलाला जन्म दिला आहे.
4 / 10
८ फेब्रुवारी रोजी या ट्रान्स जोडप्याला सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे मुलगा झाला. अशा प्रकारची ही देशातील पहिलीच घटना मानली जाते.
5 / 10
त्यानंतर या जोडप्याने रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की, जरी साहदने मुलाला जन्म दिला असला तरी, ट्रान्समॅनला बाळाचे वडील आणि आईच्या नावाच्या जागी त्याची ट्रान्सवुमन पार्टनर झिया पावलचे नाव देण्यात यावे.
6 / 10
ट्रान्समॅन साहद आणि ट्रान्सवुमन झिया पावल हे ट्रान्सकपल तीन वर्षांपासून एकमेकांसोबत राहत आहेत. या ट्रान्सकपलची प्रेमकहाणी देशातील पहिलंच प्रकरण असल्याचं बोललं जात आहे.
7 / 10
खरंतर, साहद ही जन्मत: एक महिला होती आणि झिया पुरूष. पण दोघांनीही लिंग बदलले आहेत.
8 / 10
सर्जरी दरम्यान झाहदने स्तन काढून टाकले. मात्र त्याचे गर्भाशय आणि इतर काही शरीरातील अवयव काढले नाही. या कारणामुळे तो गरोदर राहिला असून, तो आता आई झाला.
9 / 10
त्यांनी याआधी मुल दत्तक घेण्याचा विचार केला. मात्र, त्यांना परवानगी न मिळाल्यामुळे या कपलने स्वतःचे मुल या जगात आणण्याचा विचार केला.
10 / 10
बाळाने समाजासाठी काहीतरी करावं अशी इच्छा ट्रान्सजेंडर जोडप्यानं यावेळी व्यक्त केली आहे. तसेच पुढील सहा महिने आम्ही पूर्णपणे विश्रांती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
टॅग्स : केरळट्रान्सजेंडरसोशल व्हायरलसोशल मीडिया