किरण रावला कसे सापडले फूल-जया आणि दीपक-लापता लेडीजची वाचा अनोखी गोष्ट

Published:September 23, 2024 04:44 PM2024-09-23T16:44:14+5:302024-09-23T16:55:25+5:30

Kiran Rao: Unveiling the royal legacy of Aamir Khan's ex-wife : दिग्दर्शक किरण रावच्या लापता लेडीजची ऑस्कर भरारी, एका साध्या गोष्टीचा सुंदर प्रवास

किरण रावला कसे सापडले फूल-जया आणि दीपक-लापता लेडीजची वाचा अनोखी गोष्ट

किरण राव (Kiran Rao). एक उत्तम भारतीय चित्रपट निर्माती, लेखिका व दिग्दर्शिका अशी तिची ओळख, आणि अभिनेता आमीर खान (Amir Khan) यांची एक्स वाईफ. पण काही महिन्यांपूर्वी ती प्रकाशझोतात आली ते म्हणजे 'लापता लेडीज' (Laapta Ladies) या हटके आणि मसालेदार चित्रपटामुळे. नुकतंच भारतातर्फे ऑस्करसाठी (Oscar) या चित्रपटाची अधिकृत एन्ट्री झाली असून, सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे(Kiran Rao: Unveiling the royal legacy of Aamir Khan's ex-wife).

किरण रावला कसे सापडले फूल-जया आणि दीपक-लापता लेडीजची वाचा अनोखी गोष्ट

२०२५च्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडीज चित्रपटाची निवड झाल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर, किरण राव हे भारदस्त नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जया फूल दीपक हे कसे साधे कॅरेक्टर लोकांना आपलेसे वाटले, त्यांची सादगी ही कशी ताकद ठरली हेच या चित्रपटातील वैशिष्ट्य लोकांना भावले.

किरण रावला कसे सापडले फूल-जया आणि दीपक-लापता लेडीजची वाचा अनोखी गोष्ट

किरण राव नक्की कोण, तिचा आजवरचा प्रवास कसा होता? आमीर खानसोबत लग्न आणि नंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय. यासह तिच्या एकंदरीत प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी आता तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.

किरण रावला कसे सापडले फूल-जया आणि दीपक-लापता लेडीजची वाचा अनोखी गोष्ट

किरण रावचा जन्म ७ नोव्हेंबर १९७३ रोजी बंगळुरू येथे एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. किरण राव जनापल्ली असं तिचं पूर्ण नाव आहे. किरणच्या आजोबांचे नाव जनकपल्ली जे. रामेश्वर राव होते. जे हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली असलेल्या वाणपर्थीचे राजे होते.

किरण रावला कसे सापडले फूल-जया आणि दीपक-लापता लेडीजची वाचा अनोखी गोष्ट

तर, ती निवृत्त लष्करी अधिकारी सीआर राव आणि उमा राव यांची मुलगी होती. किरणचं बालपण कोलकाता शहरात गेलं, तिने आपले प्राथमिक शिक्षण लोरेटो हाऊसमधून घेतले. १९९२ साली किरणचे आई वडील कोलकाता सोडून मुंबईला आले.

किरण रावला कसे सापडले फूल-जया आणि दीपक-लापता लेडीजची वाचा अनोखी गोष्ट

मुंबईत आल्यानंतर किरणने सोफिया कॉलेजमधून कला विषयात पदवी घेतली. त्यानंतर ती दिल्लीला गेली. तिथे तिने जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. किरणने अर्थशास्त्र विषयात पदवी आणि मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स केलं. लगान या ब्लॉकबस्टर चित्रपटापासून तिने आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. लगान या चित्रपटामध्ये किरण रावने सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली. आणि याच सेटवर आमीर - किरणची ओळख झाली.

किरण रावला कसे सापडले फूल-जया आणि दीपक-लापता लेडीजची वाचा अनोखी गोष्ट

किरण रावने अकॅडमी अवॉर्ड नॉमिनेटेड दिग्दर्शक मीरा नायर यांच्या चित्रपटाच्या मान्सून वेडिंगला देखील असिस्ट केलं होतं. याशिवाय किरणने 'जाने तू या जाने ना', 'पीपली लाइव्ह', 'धोबी घाट', 'डेली बेली', 'तलाश', 'दंगल', 'सिक्रेट सुपरस्टार', सारख्या बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. आकडेवारी पाहिल्यास किरण रावने आमिर खानपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.

किरण रावला कसे सापडले फूल-जया आणि दीपक-लापता लेडीजची वाचा अनोखी गोष्ट

किरण आणि आमीर खानने आपली लग्नगाठ डिसेंबर २००५ साली बांधली. २००० साली आमीरनं पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेतला. रीना आणि आमीर या दोघांना दोन मुलं आहेत. घटस्फोट घेतल्यानंतर या दोघांनी डेटिंगला सुरुवात केली. मिडिया रिपोर्टनुसार, दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. दीड वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. मात्र, २०२१ साली त्यांनी विभक्त होण्याची घोषणा केली. त्या दोघांनी 'हॅपी' घटस्फोट घेतला. दोघांनाही आझाद नावाचा मुलगाही आहे. ते दोघे आजही मित्र म्हणून वावरताना आपल्याला अनेक ठिकाणी दिसतील.

किरण रावला कसे सापडले फूल-जया आणि दीपक-लापता लेडीजची वाचा अनोखी गोष्ट

किरण रावला आई होण्यासाठीही बराच संघर्ष करावा लागला होता. झूमला दिलेल्या मुलाखतीत किरण रावने आई होण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला हे सांगितलं होतं. 'आम्ही धोबीघाट चित्रपटाची तयारी करत होतो, तेव्हा मुलगा आझाद खानचा जन्म झाला. आम्ही सरोगसीची मदत घेतली, त्यामुळे आमिर आणि मी पालक होऊ शकलो. याचे मुख्य कारण म्हणजे माझे अनेक गर्भपात झाले होते आणि मी पुन्हा पुन्हा गर्भधारणा करू शकत नव्हते.'

किरण रावला कसे सापडले फूल-जया आणि दीपक-लापता लेडीजची वाचा अनोखी गोष्ट

एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर पाणी फाउंडेशनचं काय? असा प्रश्न लोकांमध्ये उपस्थित झाला होता. दरम्यान, एकमेकांपासून विभक्त झालो असलो तरी, आम्ही परिवार म्हणून एकच राहणार आहोत. आम्ही दोघेही पहिल्याप्रमाणेच चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्टवर एकत्रित काम करणार आहोत असं आमिर खान आणि किरण राव म्हणाल्या.