किचन डेकोरेट करण्याच्या स्मार्ट, स्वस्तात मस्त ट्रिक्स; फक्त ५०० रुपये खर्च करुनही किचन दिसेल नवं..

Published:February 9, 2023 06:16 PM2023-02-09T18:16:38+5:302023-02-09T18:59:20+5:30

kitchen decoration idea in 500 rupees : स्वयंपाकघरात चहा, साखर , मसाले ठेवण्याचे डबे एकसारखे असावेत. ज्यामुळे किचन अधिक व्यवस्थित, रेखिव दिसतं

किचन डेकोरेट करण्याच्या स्मार्ट, स्वस्तात मस्त ट्रिक्स; फक्त ५०० रुपये खर्च करुनही किचन दिसेल नवं..

घरातलं सगळ्यात आवडतं आणि महिलांच्या हक्काचं ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर. कितीही आवरलं तरी स्वयंपाकघरात पसारा आहे, अस्वच्छ आहे असंच वाटतं. स्वयंपाकघर डेकोरेट करण्याच्या काही सोप्या आयडीयाज पाहूया. कमीत कमी खर्चात म्हणजेच १००० रूपयांच्या आत तुम्ही स्वयंपाकघर घर सुशोभित करू शकता. (Beautiful finds for your kitchen under Rs.500)

किचन डेकोरेट करण्याच्या स्मार्ट, स्वस्तात मस्त ट्रिक्स; फक्त ५०० रुपये खर्च करुनही किचन दिसेल नवं..

१) किचनमध्ये सुंदर आयताकार आसनं आणि फुलदाण्यांचा समावेश करा. यामुळे किचन स्वच्छ आणि अधिक टापटीप दिसेल. स्वयंपाक करताना तुमचं मन किचनमध्ये चांगलं रमेल.

किचन डेकोरेट करण्याच्या स्मार्ट, स्वस्तात मस्त ट्रिक्स; फक्त ५०० रुपये खर्च करुनही किचन दिसेल नवं..

२) इको फ्रेंडली स्वयंपाकघर ठेवण्याचा प्रयत्न करा जिथे तुम्ही कमीत कमी विद्यूत उपकरणं वापरू शकता. इको फ्रेंडली स्वयंपाक घर बांधण्याचा भाग म्हणून तुम्ही खिडकीजवळ सिंकचा समावेश करू शकता जिथे नैसर्गिक प्रकाश आणि हवा चांगली येईल.

किचन डेकोरेट करण्याच्या स्मार्ट, स्वस्तात मस्त ट्रिक्स; फक्त ५०० रुपये खर्च करुनही किचन दिसेल नवं..

३) किचन मोठं असेल तर स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी खुल्या स्वयंपाकघरातील शेल्फ वापरून पाहू शकता. तुम्ही लाकडापासून बनवलेल्या प्रचलित शेल्फ् 'चे रुप निवडू शकता जे तुम्हाला पुरेशी जागा देतात, ज्याचा वापर तुमची महागडे डिनरवेअर ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.

किचन डेकोरेट करण्याच्या स्मार्ट, स्वस्तात मस्त ट्रिक्स; फक्त ५०० रुपये खर्च करुनही किचन दिसेल नवं..

४) स्वयंपाकघरच्या मध्यभागी एक सुंदर लाकडी टेबल जोडून तुम्ही तुमच्या सुंदर स्वयंपाकघरात आश्चर्यकारक स्कॅन्डिनेव्हियन लक्झरी मिळवू शकता. हे टेबल आदर्शपणे स्वयंपाकघरातील कॅबिनेट आणि वर्कटॉप्सजवळ ठेवले पाहिजे.

किचन डेकोरेट करण्याच्या स्मार्ट, स्वस्तात मस्त ट्रिक्स; फक्त ५०० रुपये खर्च करुनही किचन दिसेल नवं..

५) घरात झाडं ठेवली तर घर लाईव्ह वाटू लागतं. तसंच स्वयंपाकघराचंही आहे. ओट्याजवळ खिडकीजवळ किंवा डायनिंग टेबलवर, स्वयंपाकघरातील कॉर्नरवर चांगला प्रकाश येतो अशा ठिकाणी इनडोअर प्लान्टचं ठेवा. यामुळे तुमचं स्वयंपाकघर लाईव्ह वाटेल.

किचन डेकोरेट करण्याच्या स्मार्ट, स्वस्तात मस्त ट्रिक्स; फक्त ५०० रुपये खर्च करुनही किचन दिसेल नवं..

६) स्वयंपाकघरात कुठेही कचरा नसेल याची काळजी घ्या. ओट्याच्या खाली कचरा पडून राहीला तर ते खराब दिसतं आणि दुर्गंधीसुद्धा येते म्हणून किचन सिंकच्या खाली कचरा टाकण्यासाठी व्यवस्थित अरेंजमेंट करून घ्या. जेणेकरून अजिबात कचरा दिसणार नाही. ही बॅग रोज बदलायला विसरू नका.

किचन डेकोरेट करण्याच्या स्मार्ट, स्वस्तात मस्त ट्रिक्स; फक्त ५०० रुपये खर्च करुनही किचन दिसेल नवं..

७) स्वयंपाकघकरात चहा, साखर , मसाले ठेवण्याचे डबे एकसारखे असावेत. ज्यामुळे किचन अधिक व्यवस्थित, रेखिव दिसतं.

किचन डेकोरेट करण्याच्या स्मार्ट, स्वस्तात मस्त ट्रिक्स; फक्त ५०० रुपये खर्च करुनही किचन दिसेल नवं..

८) किचन सजवण्यासाठी बाजारात आजकाल बरीच उपकरणं मिळतात. तुम्ही 'मम्माज किचन' किंवा 'हॅप्पी फॅमिली' असे बोर्ड किचनला लावू शकता.