अंगावर शहारा येण्याचे शास्त्रीय कारण जाणून घ्या... शहारा येतो कारण..
Updated:February 19, 2025 14:54 IST2025-02-19T13:54:11+5:302025-02-19T14:54:57+5:30
Know the scientific reason behind the goosebumps : अंगावर शहारा का येतो? जाणून घ्या.

अंगावर शहारा येण्यामागील कारणे जाणून घ्या. असं काय होतं की अंगावर अचानक काटा येतो.
याला पायलोमोटर रिफ्लेक्स असेही म्हणतात. अंगावरील केसांच्या तळाशी असणार्या मासपेशी आकुंचन पावतात. त्यावरील केस उभे राहतात. यालाच आपण अंगावर शहारा येणं म्हणतो.
ही प्रक्रिया भावनांवर आधारित असते. आनंद झाल्यावर असे होते. भीती वाटल्यावर होते. उत्साहाने होते. अनेक कारणे असतात.
शरीरावरील केसांमध्ये हवा खेळती राहते. त्वचेजवळ इन्सुलेशनचा थर तयार होतो. त्यामुळे शरीरातील उष्णता तशीच राहते.
शरीराला अचानक गार वारा लागला की, कोशांमधील स्नायु आकुंचित होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात अंगावर शहारे येतात. शरीर उष्णता मिळवण्याचा प्रयत्न करत असते.
मेंदूमध्ये भावनांवर नियंत्रण ठेवणारा एक भाग असतो. मेंदूमधील अमिग्डाला आणि हायपोथालेमस हे दोन्ही चेतासंस्थेशी जोडलेले असतात. चेतासंस्था पायलोमोटरशी जोडलेली असते त्यामुळे भावना जागृत झाल्यावर शहारा येतो.
त्वचा थंड पडली की केसांचे स्नायू ओढले जातात. त्यामुळे केसांवर परिणाम होतो. व ते उभे राहतात.
आवडीचे गाणे ऐकताना, चित्रपटाच्या एखाद्या दृष्यावेळी अंगावर काटा येतो.
याचा संबंध मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टिमशी जोडलेला आहे. मेंदू शरीरातील डोपामाइन बाहेर सोडतो. त्याला आनंदाचा संप्रेरक असेही म्हणतात.
मेंदूत होणार्या विविध प्रक्रियांमुळेही अंगावर शहारा येतो. कधीतरी काहीच कारण नसताना अचानक शहारा येतो. कारण मेंदूत काही तरी सुरू असते जे आपल्याला जाणवत नाही.