लापता लेडीजमधली पुष्पा रानी, तिच्या ‘जया’ची जगभर चर्चा, नॅशनल क्रश बनलेली ‘ती’ आहे तरी कोण? Published:May 14, 2024 05:42 PM 2024-05-14T17:42:26+5:30 2024-05-14T17:48:57+5:30
('Laapataa Ladies' leading lady Pratibha Ranta recounts her journey from small screen to big, emphasises on importance of dreaming big : लपता लेडीज ते हीरामंडी! प्रतिभा रंता बनली नवी नॅशनल क्रश, प्रीती झिंटाशी आहे खास कनेक्शन आणि.. आमिर खानची (Amir Khan) एक्स वाइफ किरण रावचा (Kiran Rao) लापता लेडीज (Laapata Ladies) सध्या खूप चर्चेत आहे. तर, दुसरीकडे संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा हिरामंडी (Heeramandi) चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. या दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, आणि ती कॉमन गोष्ट म्हणजे अभिनेत्री प्रतिभा रंता (Pratibha Ranta). सौंदर्यापासून ते अभिनयापर्यंत. प्रतिभाने सिनेसृष्टीत पदार्पण करताच आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. प्रतिभा रंता नक्की आहे तरी कोण? पाहूयात('Laapataa Ladies' leading lady Pratibha Ranta recounts her journey from small screen to big, emphasises on importance of dreaming big).
नेटफ्लिक्सवरील हिरामंडी आणि लापता लेडीज या दोन्ही चित्रपटांनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. त्यातील कलाकारांनी केलेला अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला. पण आपल्याला हिरामंडीमधील शमा आठवतेय? तिने लापता लेडीजमध्ये जयाची भूमिका साकारली आहे. ती सध्या नेटकऱ्यांची नॅशनल क्रश बनली आहे.
अभिनेत्री प्रतिभा रंताचा जन्म १७ डिसेंबर २००० रोजी, हिमाचल प्रदेशातील शिमल्याच्या टिक्कर येथील पहारी राजपूत कुटुंबात झाला. तिने आपलं शालेय शिक्षण शिमल्यातील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी, चेल्सी येथून पूर्ण केले. तर, मुंबईतील उषा प्रवीण गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधून फिल्म मेकिंगची पदवी प्राप्त केली.
तिने आपल्या अभिनयाची सुरुवात 'कुर्बान हुआ' या टेलिव्हिजन शोमधून केलं. या शोच्या माध्यमातून तिला घराघरात ओळख मिळाली.
तर, २०२४ हे साल तिच्यासाठी खास ठरत आहे. कारण या साली प्रतिभाने 'लापता लेडीज' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तर संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेब सिरीजमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली. या वेब सिरीजमध्ये साकारलेलं पात्र, प्रेक्षकांसह समीक्षकांनाही आवडलं.
प्रतिभा ही प्रीती झिंटा हिला आपला आदर्श मानते. प्रीती आणि प्रतिभा या दोघी एकाच गावातील असून त्या एकाच शाळेतही शिकल्या आहेत.
पीटीआयला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीदरम्यान, प्रतिभा रंता म्हणाली, 'प्रीती झिंटा माझ्या मूळ गावी शिमला, हिमाचल प्रदेशची आहे. जिथे प्रीती झिंटा शिकल्या, तिथेच माझं देखील शिक्षण पूर्ण झालं. माझे कुटुंब अनेकदा मला म्हणायचे, 'सबकी किस्मत प्रीती झिंटा जैसी नहीं होती.' खरं तर, मला गावातही तिच्या नावानेच चिडवायचे.'
ती पुढे म्हणते, 'म्हणून मी अभिनेत्री होण्याचं ठरवलं. एक दिवस मी मुंबईला जाणार आहे आणि अभिनेत्री होऊन दाखवणार. ही जिद्द माझ्या मनात होती.'
प्रतिभा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती आपले अपडेट्स शेअर करीत असते. तिचे सोशल मिडीयावर २ लाख ६६ हजार फॉलोव्हर्स असून, तिच्या ग्लॅमरस फोटोंची कायम चर्चा होत असते.
लापता लेडीजमधील तिची दमदार भूमिका असो किंवा हीरामंडीतील तिचा साधेपणा. प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाला पसंती दर्शवली आहे.