Maghi Ganesh Jayanti: १० मिनिटांत काढता येण्यासारख्या गणपतीच्या ८ सोप्या रांगाेळ्या, घर होईल प्रसन्न..
Updated:February 1, 2025 11:20 IST2025-02-01T11:10:21+5:302025-02-01T11:20:32+5:30

श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस म्हणजे गणेश जयंती. माघी गणेश जयंती म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. यादिवशी गणेशभक्तांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असते. म्हणूनच या दिवशी तुमच्या घराचे पावित्र्य आणि प्रसन्नता आणखी वाढविण्यासाठी अंगणात काढता येतील अशा काही साध्या- सोप्या गणपतीच्या रांगोळ्या पाहा..
रंग आणि रांगोळी वापरून नेहमीप्रमाणे रांगोळी काढायची नसेल तर अशी वेगवेगळ्या फुलांचा वापर करून तुम्ही गणपतीची रांगोळी काढू शकता.
ही एक अतिशय वेगळी आणि खूपच कमी वेळात होणारी गणपतीची रांगोळी पाहा. ही रांगोळी अगदी सहज काढता येण्यासारखी आहे.
घरासमोर खूपच कमी जागा असेल तर ही एक छोटीशी रांगोळी तुम्ही काढू शकता.
कमी जागेत काढता येण्यासारखी ही आणखी एक रांगोळी. या रांगोळीतील गणपती आणि त्याच्या आजुबाजुची फुलं खूप नजाकतीने काढण्यात आली आहेत. त्यामुळे रांगोळी आकाराने लहान असूनही खूपच भरीव आणि लक्षवेधी वाटते.
पानांचा आकार देऊन काढलेली गणरायाची ही आणखी एक सुरेख रांगोळी. ही रांगोळी दिसायला अवघड वाटत असली तरी काढायला खूपच सोपी आहे.
मधोमध असा गणपती काढून तुम्ही त्याच्या आजुबाजुने तुमच्या आवडीचे इतर कोणतेही डिझाईन काढू शकता.
गणपतीची ही एक अत्यंत वेगळी आणि खूप झटपट होणारी रांगोळी पाहा. वेळ कमी असेल तर अशी रांगोळी अगदी पटकन काढून होईल.
या पद्धतीची रांगोळीही तुम्ही काढू शकता. त्याच्या आजुबाजुला झेंडुची फुलं आणि काही पणत्या लावून ठेवा. रांगोळी खूप छान दिसेल.