महाशिवरात्र स्पेशल : पाहा १० सुंदर आकर्षक रांगोळ्या - चटकन काढता येतील अशा झटपट डिझाइन्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 3:37 PM 1 / 10महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण भारतभरात असतो. यावर्षी ८ मार्चला (Mahashivratri 2024) महाशिवरात्रीचे पर्व साजरे केले जाणार आहे. याशिवाय भगवान शिवाचे उपासक शिव शंकराची पूजा-आराधना करतात. या निमित्ताने घरात देव्हाऱ्याजवळ किंवा बाहेर अंगणात तुम्हाला रांगोळ्या काढायच्या असतील तर तुम्ही या सरळ, सोप्या डिजाईन्स ट्राय करू शकता.( Mahashivratri Rangoli Designs Easy And Beautiful) 2 / 10महाशिवरात्रीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे महत्व अधिक असते. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तांदूळ किंवा पांढऱ्या फुलांचा वापर करून सुंदर रांगोळी काढू शकता. 3 / 10शिवलिंगाची गोल डिजाईन बनवण्यासाठी तुम्ही गोल झाकणाचा वापर करू शकता. शिवलिंगावरची डोळ्यांची डिजाईन तयार करण्यासाठी निळ्या रंगाचा वापर करा.4 / 10तुमच्याकडे फार वेळ नसेल तरीही तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता. लाल पांढऱ्या फुलांनी रांगोळी उठून दिसेल.5 / 10शिवलिंगावर बेलपत्र चढवणं शुभ मानलं जातं तुम्ही रांगोळी काढताना हिरव्या रंगाने बेलाचे पान काढून त्यावर डिजाईन काढून शकता. 6 / 10शिवलिंगाची छोटी रांगोळी काढून तुम्ही त्या खाली ओम नम: शिवाय असं लिहू शकता.7 / 10भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तांब्याच्या थाळीत शिवलिंगाची डिजाईन तयार करून महादेवाच्या समोर ठेवू शकता. ही रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला जास्तवेळही लागणार नाही. 8 / 10एकाच रांगोळीत तुम्ही त्रिशूळ, डंबरू आणि शंकराची पिंड काढू शकता.9 / 10शंकराच्या पिंडीच्या अवतीभवती रुदाक्षांची माळ काढू शकतात आणि गोल किंवा चौकोन काढून चारही बाजूंनी सजवा.10 / 10पिवळ्या रंगाचा वापर करून तुम्ही पिंडीच्या वरच्या बाजूला सुर्याची डिजाईन काढू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications