1 / 8हल्ली सणाच्या किंवा एखाद्या खास दिवसाच्या थीमनुसार घराची सजावट करण्याचा, घरासमोर रांगोळी काढण्याचा ट्रेण्ड आहे. तुम्हालाही या थीमनुसार घरासमोर महाशिवरात्री (Maha Shivratri 2025) विशेष रांगोळी काढायची असेल तर त्यासाठी बघा काही साधे- सोपे डिझाईन्स..2 / 8ही एक छानशी रांगोळी पाहा. बेलाचं पान आणि त्यावर महादेवाची पिंड अशी ही सुंदर रांगोळी खूप कमी वेळात काढून होईल.3 / 8बेलाची पानं, त्रिशूळ आणि महादेवाचे गंध ही रांगोळी दिसायला जेवढी आकर्षक आहे तेवढीच काढायला सोपी आहे. एकदा नक्की ट्राय करून पाहा.4 / 8हे एक आणखी सुंदर रांगोळी डिझाईन.. महादेवाच्या पिंडीभोवती जी फुलं रांगोळीने काढली आहेत, त्याऐवजी तुम्ही खऱ्या फुलांचा वापरही करू शकता.5 / 8ठिपक्यांची रांगोळी आवडत असेल तर या रांगोळीचा नक्कीच विचार करू शकता.6 / 8ही रांगोळी अतिशय वेगळ्या पद्धतीने काढली आहे. गजरा, दिवे यांचा खराखुरा वापर केल्याने रांगोळीला थ्री डी लूक येत आहे.7 / 8तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असेल तर या रांगोळीचा विचारही करू शकता. महादेवाची पिंड, गणपती, शंख, ओम, श्री असं सगळंच या रांगोळीमध्ये येतं..8 / 8हे एक झटपट होणारं सोपं डिझाईन. मधली महादेवाची पिंड व्यवस्थित काढता आली की त्याच्या आजुबाजुला तुम्ही कोणतीही रंगसंगती घेऊ शकता.