Makar Sankranti: संक्रातीला दारापुढे ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळी- पतंगांनी खास सजावट
Updated:January 7, 2025 17:59 IST2025-01-07T16:46:03+5:302025-01-07T17:59:49+5:30
Makar Sankranti 2025 Makar Sankranti Special Rangoli Designs : संक्रातीच्या दिवशी पतंग उडवली जाते. तुम्ही रांगोळीत पतंग, मांजा काढून त्यावर शुभ संक्रांत असा छोटा संदेश लिहू शकता.

मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2025) सणाला दारापुढे आकर्षक रांगोळी काढली असेल तर मन प्रसन्न वाटतं. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सुंदर, सुंदर रांगोळी दारासमोर काढू शकता ते ही अगदी कमी वेळात. (Makar Sankranti Rangoli Designs)
संक्रातींच्या दिवशी दारापुढे काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिजाईन्स पाहूया. या रांगोळ्या काढण्यासाठी तुम्ही पतंग, तीळगूळ, नथ, हळद-कुंकू, बांगड्या अशा वेगवेगळ्या डिजाईन्सची मदत घेऊ शकता. (Makar Sankranti 2025 Makar Sankranti Special Rangoli Designs)
युट्यूबवर तुम्हाला या वेगवेगळ्या डिजाईन्स सहज उपलब्ध होतील. व्हिडीओ पाहून किंवा फोटो पाहून तुम्ही झटपट सुंदर कलर कॉम्बिनेशची रांगोळी काढू शकता.
संक्रातीच्या दिवशी पतंग उडवली जाते. तुम्ही रांगोळीत पतंग, मांजा काढून त्यावर शुभ संक्रांत असा छोटा संदेश लिहू शकता.
संक्रांतीची रांगोळी काढणं अत्यंत सोपे आहे. तुम्ही यात आपल्या आवडीनुसार रंग भरू शकता.
तुम्ही ही रांगोळी काढण्यासाठी पिवळ्या, लाल फुलांचाही वापर करू शकता.
जर तुमच्याकडे गोलाकार जाळी असेल तर त्यात रंग भरून मग बॉर्डर काढा.
चौकोन पाटी ठेवून त्याचे पतंगाप्रमाणे ४ भाग करा आणि त्यात रंग भरा. प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळ्या आकृत्या काढा. ज्यामुळे रांगोळी सुंदर दिसेल.
रांगोळीच्या अवतीभोवती दिवे लावल्यानं दरवाजा अधिकच सुंदर दिसेल.
शुभ संक्रांत किंवा हॅप्पी संक्रात असा संदेश तुम्ही रांगोळीत लिहू शकता.