1 / 7Makar Sankranti Haldi Kunku 2025: मकर संक्रांत ते रथसप्तमी या काळात हळदी- कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केले जातात. सणाच्या थीमनुसार घराची सजावट केली जाते. मग असं असताना दारासमोर तरी तिच ती टिपिकल रंग वापरून रांगोळी कशाला काढायची. 2 / 7त्याऐवजी संक्रांतीच्या हळदी- कुंकू कार्यक्रमासाठी तुम्ही वाणवसाचं साहित्य वापरून एकदम वेगळ्या रांगाेळ्या काढू शकता. 3 / 7संक्रांतीच्या दिवशी महिला एकमेकींना मातीच्या बोळक्यांमध्ये बोरं, मटार शेंगा, वालाच्या शेंगा, गाजर, ऊस, गव्हाच्या ओंब्या असं साहित्य देत असतात. त्याच साहित्याच्या तुमच्या हळदी- कुंकू कार्यक्रमाच्या रांगोळीसाठी असा सुंदर उपयोग होऊ शकतो. 4 / 7वेगवेगळे दागिने आणि ओटीचं सामान वापरून अशी सुरेख रांगोळी काढता येते. पाहताक्षणीच सगळ्यांना ती नक्की आवडेल. 5 / 7तुमच्याकडे मोकळी जागा असेल तर ही रांगोळी नक्की काढून पाहा. रांगोळी काढायला मोठी असली तरी ती खूप झटपट काढून होते.6 / 7कमी जागेत काढण्यासाठी ही रांगोळी अतिशय सुंदर आहे. 7 / 7हळदी- कुंकू कार्यक्रम जिथे करणार आहात तिथे एका कोपऱ्यातही अशी सुंदर रांगोळी काढून ठेवू शकता.