1 / 8अनेक महिला मकर संक्रांतीचे हळदी- कुंकू खूप उत्साहात करतात. यानिमित्ताने मैत्रिणी एकत्र येतात, थोड्या गप्पाटप्पा होतात आणि वेळ छान जातो. 2 / 8आता आपल्या घरी कोणी येणार म्हणजे नुसतं हळदीकुंकू देऊन होत नाही. त्यासोबत काहीतरी चवदार खायला दिलं तर कार्यक्रमाची शोभा आणखी वाढते. 3 / 8पण ते पदार्थ असे हवेत की ते करायला खूप जास्त मेहनत लागू नये. शिवाय ते अगदी झटपट होतील आणि वाढायलाही सोपे जातील असे हवेत. असे नेमके कोणते पदार्थ तुम्ही करू शकता ते पाहा..4 / 8सगळ्यात पहिला पदार्थ आहे भेळ. चटपटीत भेळ हा बऱ्याच लोकांचा वीकपॉईंट असतो. शिवाय चटपटीत भेळ करायला खूप वेळही लागत नाही आणि खूप काही तयारीही करावी लागत नाही. 5 / 8झटपट करता येणारा दुसरा पदार्थ म्हणजे मसाला दूध. थंडीच्या दिवसात गरमागरम मसाला दूध प्यायला छान वाटतं. शिवाय ते सर्व्ह करायलाही अगदी सोपं आहे. 6 / 8इडली- चटणी हा एक मेन्यू तुम्ही हळदी- कुंकू कार्यक्रमात येणाऱ्या मेत्रिणींना देऊ शकता. पण इडली गरम गरम सर्व्ह करता येणार नसेल तर इडल्या आधीच करून ठेवा आणि त्या गरमागरम सांबारसोबत सर्व्ह करा. 7 / 8फ्रुट सलाड किंवा फ्रुट कस्टर्ड हे देखील अनेक जणांच्या आवडीचे पदार्थ आहेत. हिवाळ्यात फळं भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे हा एक चवदार आणि पौष्टिक पदार्थ तुम्ही अगदी सहज करू शकता.8 / 8भरपूर भाज्या घालून केलेलं सँडविचही आवडीने खाल्लं जातं. शिवाय सँडविच गरम गरमच सर्व्ह करायला पाहिजे असंही काही नाही. त्यामुळे सँडविचचा विचारही तुम्ही नक्की करू शकता.