मकर संक्रांत स्पेशल : हळदीकुंकवासाठी दारासमोर काढा झटपट-आकर्षक रांगोळी, पाहा सोपे डिझाईन्स... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2024 4:05 PM 1 / 8सणावाराला दारात रांगोळी काढणे शुभ मानले जात असल्याने आपल्याकडे सणानुसार आवर्जून रांगोळी काढण्याची पद्धत आहे (Makar Sankranti Special Easy Rangoli Designs). 2 / 8 मकर संक्रांत हाही संक्रमणाच्या दृष्टीने हिवाळ्यात येणारा १ महत्त्वाचा सण असून या दिवशी महिला एकमेकींकडे हळदी-कुंकवाला जातात. 3 / 8दारात झटपट आणि तरीही सोपी अशी रांगोळी काढायची असेल तर ऐनवेळी काय काढायचे हे आपल्याला सुचत नाही. 4 / 8पतंग आणि हळदीकुंकू हे संक्रांतीच्या सणाची प्रतिकं असल्याने ती रांगोळीत काढण्याची पद्धत आहे. 5 / 8 गडद रंगांचा वापर करुन साधासा पतंग आणि मांजाचा रीळ काढल्यासही झटपट अशी सोपी रांगोळी काढता येऊ शकते. 6 / 8तीळगूळ , हळद कुंकू, पतंग असे सगळे एकाच रांगोळीत कलात्मक पद्धतीने दाखवायचे असेल तर हा चांगला पर्याय ठरु शकतो. 7 / 8संक्रांतीला महिला एकमेकींना वसा देतात ते लहान आकाराचे गडू ठेवून अशी थोडी वेगळी रांगोळी काढली तरी ती आकर्षक दिसते. 8 / 8 गडद रंगात आकर्षक असे सौभाग्यलंकार काढलेली ही रांगोळी हळदीकुंकवाला काढण्यासाठी अगदी सोपी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications