Join us   

मार्गशीर्ष गुरुवार: देवीच्या पूजेसाठी चटकन करा आकर्षक सजावट! पूजेचा उत्साह वाढून प्रसन्न वाटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2024 1:32 PM

1 / 6
अनेक महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी कलश स्थापन करून देवी लक्ष्मीची मनोभावे सेवा करतात. यावेळी पूजेची मांडणी अधिक आकर्षक कशी करायची, मोजक्या वस्तू वापरून पूजेची जागा कशी सुशोभित करायची, याविषयी या काही खास टिप्स...
2 / 6
अशा पद्धतीने देवीच्या मागच्या भिंतीवर फुलांच्या माळा लावून तुम्ही साधी- सोपी आणि झटपट होणारी सजावट करू शकता. दोन्ही बाजुला दिवे किंवा समया ठेवल्या तर मांडणी अधिक आकर्षक वाटते.
3 / 6
पूजा मांडणार आहात ती जागा जर थोडी मोठी असेल तर अशा पद्धतीचा बॅकड्रॉप टाकून सजावट करा. बाजारात केळीच्या पानांचे, आंब्याच्या पानांचे, झेंडूच्या फुलांचे खूप सुंदर बॅकड्रॉप मिळतात. त्यांचाही वापर तुम्ही करू शकता.
4 / 6
देवीच्या मागे अशा पद्धतीची विड्याच्या पानांची किंवा आंब्याच्या पानांची प्रभावळ लावली तरी तुमची पूजा खूप उठून दिसेल.
5 / 6
कलश स्थापना अशा पद्धतीने थोडी उंचावर करता आली तर अधिक चांगले. यामुळे सजावट करायला आणखी मोकळी जागा मिळते आणि वेगवेगळ्या वस्तू वापरून सजावट करता येते.
6 / 6
तुमच्याकडे मोकळी जागा असेल तर अशा पद्धतीने लक्ष्मीचा मोठा बॅकड्रॉप आणून अशी भव्य पूजा मांडणी करा. तुमच्याकडची पूजा सगळ्यांपेक्षा जास्त उठून दिसेल, आकर्षक वाटेल.
टॅग्स : सोशल व्हायरलगृह सजावट