Margashirsha guruvar rangoli designs, simple and easy rangoli designs for Margashirsha guruvar
मार्गशीर्ष गुरुवार विशेष रांगोळ्या- फक्त ५ मिनिटांत काढा सुरेख रांगोळी- पाहूनच मन होईल प्रसन्नPublished:December 2, 2024 03:12 PM2024-12-02T15:12:39+5:302024-12-02T16:06:30+5:30Join usJoin usNext मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी अनेक महिला मनापासून व्रत, उपवास करतात. यादिवशी कलश स्थापन करून लक्ष्मीची पूजा केली जाते. रांगोळी काढून, स्वच्छता करून घर आणि पुजेची जागा सुशोभित केली जाते. म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवारी झटपट काढता येतील अशा काही साध्या, सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स.. गुरुवारी पुजेच्या दिवशी तुम्ही मुख्य दरवाजाजवळ अशा पद्धतीची कलश रांगोळी काढू शकता. ही रांगोळी दिसायला अवघड असली तरी काढायला अगदी सोपी आहे. जेव्हा तुमच्याकडे थोडा मोकळा वेळ असेल तेव्हा ही रांगोळी काढून पाहा. देवीचा मुखवटा काढायलाच फक्त थोडा वेळ लागेल. बाकी रांगोळी अगदी पटापट होऊन जाईल. मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे त्यावेळी अशी लक्ष्मीची पावलंही तुम्ही काढू शकता. ही रांगोळी दिसतेही छान आणि शिवाय ती काढण्यासाठी खूप वेळही लागत नाही. कलश काढून त्यावर अशी खरीखुरी नथ, मंगळसूत्र आणि तुमच्याकडचं एखादं गळ्यातलंही ठेवू शकता. यामुळे साध्याच रांगोळीला खूप छान शोभा येईल. मार्गशीर्ष गुरुवारसाठी कलश रांगोळी काढण्याचा हा आणखी एक वेगळा प्रकार. नुसता कलश काढण्यापेक्षा त्याला असं थाेडं आणखी सुशोभित करता येईल. कलशाच्या भोवती अशा पद्धतीची आकर्षक महिरप काढल्यामुळे ही रांगोळी जास्त उठून दिसते आहे. याऐवजी तुम्ही खऱ्याखुऱ्या फुलांचीही महिरप करू शकता. घराच्या मुख्य दाराजवळ तुम्ही अशा पद्धतीची रांगोळीही काढू शकता. देवघराच्या समोर किंवा पूजा मांडली असेल त्या चौरंगाच्या भोवती काढायला हे रांगोळी डिझाईन छान आहे. टॅग्स :रांगोळीगृह सजावटrangoliHome Decoration