1 / 9मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी अनेक महिला मनापासून व्रत, उपवास करतात. यादिवशी कलश स्थापन करून लक्ष्मीची पूजा केली जाते. रांगोळी काढून, स्वच्छता करून घर आणि पुजेची जागा सुशोभित केली जाते. म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवारी झटपट काढता येतील अशा काही साध्या, सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स..2 / 9गुरुवारी पुजेच्या दिवशी तुम्ही मुख्य दरवाजाजवळ अशा पद्धतीची कलश रांगोळी काढू शकता. ही रांगोळी दिसायला अवघड असली तरी काढायला अगदी सोपी आहे.3 / 9जेव्हा तुमच्याकडे थोडा मोकळा वेळ असेल तेव्हा ही रांगोळी काढून पाहा. देवीचा मुखवटा काढायलाच फक्त थोडा वेळ लागेल. बाकी रांगोळी अगदी पटापट होऊन जाईल.4 / 9मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे त्यावेळी अशी लक्ष्मीची पावलंही तुम्ही काढू शकता. ही रांगोळी दिसतेही छान आणि शिवाय ती काढण्यासाठी खूप वेळही लागत नाही.5 / 9कलश काढून त्यावर अशी खरीखुरी नथ, मंगळसूत्र आणि तुमच्याकडचं एखादं गळ्यातलंही ठेवू शकता. यामुळे साध्याच रांगोळीला खूप छान शोभा येईल.6 / 9मार्गशीर्ष गुरुवारसाठी कलश रांगोळी काढण्याचा हा आणखी एक वेगळा प्रकार. नुसता कलश काढण्यापेक्षा त्याला असं थाेडं आणखी सुशोभित करता येईल.7 / 9कलशाच्या भोवती अशा पद्धतीची आकर्षक महिरप काढल्यामुळे ही रांगोळी जास्त उठून दिसते आहे. याऐवजी तुम्ही खऱ्याखुऱ्या फुलांचीही महिरप करू शकता. 8 / 9घराच्या मुख्य दाराजवळ तुम्ही अशा पद्धतीची रांगोळीही काढू शकता.9 / 9देवघराच्या समोर किंवा पूजा मांडली असेल त्या चौरंगाच्या भोवती काढायला हे रांगोळी डिझाईन छान आहे.