१८ व्या वर्षी लग्न आणि दोन मुलांची आई लक्ष्मी प्रणाथी, नाटु फेम ज्युनिअर एनटीआरची लव्हस्टोरी! Published:March 13, 2023 12:53 PM 2023-03-13T12:53:59+5:30 2023-03-13T13:31:59+5:30
RRR Fame South Superstar Junior NTR’s Wife Stays Away From Limelight; Very glamorous in real life, see photos लाइमलाइटपासून जरी दूर राहत असली; तरी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस दिसते.. आज भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. ऑस्कारच्या शर्यतीत भारतीय सिनेसृष्टीतील २ कलाकृतींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यातील एक म्हणजे आरआरआर या चित्रपटातील ''नाटू - नाटू'' या गाण्याला, बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाले. साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं असून, या पुरस्कार सोहळ्याला ज्युनिअर एनटीआरने पत्नी लक्ष्मी प्रणाथीसोबत हजेरी लावली होती(RRR Fame South Superstar Junior NTR’s Wife Stays Away From Limelight; Very glamorous in real life).
ज्युनिअर एनटीआर आणि त्याच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात तिने काळ्या रंगाचा वेल्वेट गाऊन परिधान केला होता. तिला पाहून ती दोन मुलांची आई आहे, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही.
ज्युनिअर एनटीआरने लक्ष्मी प्रणाथीसोबत अरेंज मॅरेज केलं. जेव्हा या दोघांचं लग्न झालं, तेव्हा ज्युनिअर एनटीआर हा २६ वर्षांचा होता तर, लक्ष्मी फक्त १८ वर्षांची होती. या दोघांमध्ये ८ वर्षांचं अंतर आहे. ५ मे २०११ साली या दोघांनी लग्नगाठ बांधली.
त्यांच्या लग्नात तब्बल १२ हजार लोकांनी हजेरी लावली होती. फक्त कुटुंबीय आणि मित्रपरिवारच नाही तर चाहत्यांनीही हजेरी लावली होती.
लक्ष्मीचा जन्म १८ मार्च १९९२ साली हैदराबाद, तेलंगणा येथे झाला. तिने आपले शिक्षण हैदराबादच्या नजर ज्युनियर कॉलेजमधून पूर्ण केलं. तिचे वडील श्रीनिवास राव हे सुप्रसिद्ध व्यावसायिक आहेत, ते प्रसिद्ध तेलुगू वृत्तवाहिनी ‘स्टुडिओ एन’ चे मालक आहेत. तर लक्ष्मी प्रणतीची आई आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भाची आहे.
लक्ष्मी प्रणाथी ज्युनिअर एनटीआरसोबत लग्न केल्यानंतर प्रचंड प्रकाशझोतात आली. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, लक्ष्मी अनेकदा तिचे सुंदर फोटो शेअर करताना दिसते.
ती खूपच ग्लॅमरस दिसते. तिच्या अनेक पोस्टही सतत व्हायरल होत असतात.
लक्ष्मी आणि ज्युनिअर एनटीआर यांना दोन मुलं आहेत. अभय राम आणि भार्गव राम अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत.