Join us   

‘पंचायत’मध्ये घर मिळवण्यासाठी आतूर जगमोहनच्या बायकोची वाचा व्हायरल स्टोरी! ही अभिनेत्री नक्की कोण-कुठची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2024 5:42 PM

1 / 10
जितेंद्र कुमारची वेब सिरीज पंचायत ३ (Panchayat 3) सध्या खूप चर्चेत आहे (Kalyani Khatri). या वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनमध्ये नवे चेहरे पाहायला मिळत आहे. जगमोहन त्यापैकीच एक. जगमोहनच्या कुटुंबाला घरापुढील रस्ता आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वतःसाठी घर हवे होते. त्याच्यावर एक संपूर्ण एपिसोड चित्रित करण्यात आला आहे. मात्र, यात हिरव्या साडीतील हसऱ्या चेहऱ्यांच्या कल्याणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे(Meet Kalyani Khatri: Jagmohan's wife from Panchayat 3 who looks glamorous in real life, was awarded by).
2 / 10
ती स्क्रीनवर कमी कालावधीसाठी जरी दिसली असली तरी, तिने आपल्या अभिनयातून लोकांच्या मनामध्ये घर केलं आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कारासाठीही तितकीच चर्चेत आहे.
3 / 10
दरम्यान कल्याणी नक्की कोण? तिच्या अभिनयाची एवढी चर्चा का? कल्याणीची अभिनयातली कारकीर्द कशी होती? तिला इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार कशासाठी मिळाला होता? पाहूयात.
4 / 10
कल्याणी खत्री ही मुळची झारखंडची आहे. तिने आपलं शिक्षण सिदो कान्हू मुर्मू विद्यापीठातून पूर्ण केले. तिने साहेबगंज महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
5 / 10
तिला पहिल्यापासूनच अभिनयाची आवड होती. कल्याणी खत्री एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. अभिनयाच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झाल्यास, 'प्रीमतूर' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. याशिवाय तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.
6 / 10
बालविवाहाला विरोध करण्याच्या विषयावर आधारित 'डॉ बीआर आंबेडकर' या मालिकेत तिने रेणुका ही भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या या भुमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. याशिवान तिने 'राधा कृष्ण' मालिकेत एका गोपिकेची भूमिका साकरली. त्याचबरोबर ती 'लेडीज स्पेशल'मध्येही दिसली होती.
7 / 10
अभिनयाव्यतिरिक्त ती एका पुरस्कारामुळेही चर्चेत आहे. कल्याणीला २०१६ साली इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हा सन्मान तिला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला होता.
8 / 10
तिने या खास दिनानिमित्त पांढऱ्या पँटसह निळा ब्लेझर घातला होता. कल्याणीला साहिबगंज कॉलेज झारखंडच्या स्वयंसेवक पुरस्कारांतर्गत गौरविण्यात आले होते. तिने या संदर्भातले खास फोटो शेअर तर केलेच, शिवाय विशेष कॅप्शनही दिले आहे.
9 / 10
अभिनेत्री सोशल मीडियातही सक्रीय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते.
10 / 10
तिला अभिनयाव्यतिरिक्त योगसाधनेची विशेष आवड आहे. तिने योगसाधनेसंदर्भात विविध फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. ज्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेण्ट्सचा वर्षाव केला आहे.
टॅग्स : सोशल व्हायरलसोशल मीडिया