Join us

मेलानिया ट्रंपच्य हॅटची जगभरात ऑनलाइन चर्चा, त्या हॅटमध्ये ‘असं’ खास काय आहे? -वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2025 19:31 IST

1 / 9
सेलिब्रिटींचे कपडे सतत चर्चेत येत असतात. पण आता त्यांच्या हॅट यायला लागल्या आहेत. बातमी आहे मेलानिया ट्रम्प यांच्या बोटरस्टाईल टोपीची.
2 / 9
मेलानिया ट्रम्प या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि एक मॉडल आहेत.
3 / 9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'इनोग्रेशन डे'ला त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीच्या हॅटने चर्चेची जागा घेतली.
4 / 9
मेलानिया यांची ही अनोखी हॅट 'एरीक जॅविट्स' याने तयार केलेली आहे.
5 / 9
ही हॅट आधी मियामी नावाच्या शहरात डिझाइन करण्यात आली होती. तिकडून ती न्यू यॉर्कला आणण्यात आली. पण मूळ डिझाइन पसंतीस न पडल्यानं न्यू यॉर्कमध्ये ती पुन्हा नव्यानं डिझाइन करण्यात आली.
6 / 9
मेलानिया यांच्या ड्रेसचं कापड आणि या हॅटचं कापड, त्याचा पोत, एकच आहे.सगळं मॅचिंग नीट जमवण्यात आलं होतं.
7 / 9
पाश्चात्य संस्कृतीमध्ये 'इनोग्रेशन डे'ला महिला नेहमीच हॅट परिधान करत आल्या आहेत.
8 / 9
मेलानिया सतत काही ना काही कारणांनी चर्चेत येतचं असतात. या वेळी हॅट निमित्त ठरली.
9 / 9
सोशल मिडियावर काही जण हॅटचे कौतुक करत आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर ही हॅट टिपण्ण्यांचा विषय बनली आहे.
टॅग्स : डोनाल्ड ट्रम्पमेलेनिया ट्रम्पफॅशनसोशल व्हायरल