Join us   

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात गाजवते आहे बॉलीवूड, व्हायचं होतं इंजिनियर पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 7:05 PM

1 / 10
मराठी कुटुंबात जन्मलेली शर्वरी वाघ, मुंज्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली आहे (Sharvari Wagh). तिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात लीड रोलमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे (Bollywood Actress). शर्वरीने नुकतंच मुंज्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे (Munjya). दरम्यान, शर्वरी नक्की कोण? तिची चर्चा सोशल मीडियात इतकी का होत आहे? शर्वरी वाघ ही दिवंगत माजी मुख्यमंत्र्यांची नात असल्याचं म्हटलं जातं. तिच्याविषयी जाणून घेऊया(Munjya actress Sharvari Wagh is the new breakout star of Bollywood).
2 / 10
शर्वरी वाघचा जन्म १४ जून १९९७ रोजी मुंबईत मराठी कुटुंबात झाला. तिचे वडील शैलेश वाघ हे मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आहेत. शर्वरी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. हे अनेकांना ठाऊक नाही. शर्वरी ही मनोहर जोशी यांच्या कन्या नम्रता यांची लेक आहे. तिची बहीण कस्तुरी आणि आई नम्रता वाघ या दोघी आर्किटेक्ट आहेत.
3 / 10
शर्वरीने आपलं शिक्षण दादर पारसी युथ असेंब्ली हायस्कूल आणि रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केलं. तिला सुरुवातीला सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचं होतं. पण अभिनयात आवड असल्यामुळे तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
4 / 10
वयाच्या १६ व्या वर्षी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये कॉलेजमध्ये असताना तिने क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये कामही केलं.
5 / 10
शर्वरीने लहानपणी नाट्यकार्यशाळांमध्ये भाग घेतला असून, तिने बऱ्याच नाटकांमध्ये काम केलं आहे. २०१४ पासून शर्वरी सिनेसृष्टीत प्रवेश करण्यासाठी धडपडत होती. मुख्य भुमिकेसाठी ती ऑडिशन देत होती. पण अखेर २०२१ साली ‘बंटी बबली २’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची तिला संधी मिळाली.
6 / 10
शर्वरीने जेफ गोल्डनबर्ग स्टुडिओमधून अभिनयाचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. तसंच बॉलिवूडमध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते.
7 / 10
शर्वरीने याआधी ‘प्यार का पंचनामा २’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
8 / 10
विकीचा भाऊ सनी कौशल आणि शर्वरी वाघ यांनी कबीर खानच्या ‘द फॉरगॉटन आर्मी: आझादी’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा आहे, पण अद्याप या दोघांनी मीडियासमोर जाहीरपणे बोलणं टाळलं आहे.
9 / 10
मुंज्या आणि महाराज या दोन्ही हिट सिनेमांमध्ये शर्वरीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मुंज्या या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे शर्वरीचं विशेष कौतुक करण्यात आहे. ती लवकरच सितारा के तारे या चित्रपटात दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
10 / 10
यासह ती निखिल आडवाणी दिग्दर्शित वेदा आणि आदित्य चोप्राच्या अल्फा या सिनेमांमध्येही झळकणार आहे.
टॅग्स : बॉलिवूडसोशल व्हायरल