संध्याकाळ होताच घरात खूप डास येतात? ५ उपाय, डासांचा उच्छाद होईल पटकन कमी
Updated:November 11, 2022 16:06 IST2022-11-10T16:23:30+5:302022-11-11T16:06:10+5:30
Natural Mosquito Repellent Solutions : काही वनस्पतींचा वास डासांना दूर ठेवण्याचे काम करतो. तुम्ही तुमच्या घरात रोझमेरी, बेझेल आणि पुदिना लावू शकता.

संध्याकाळ होताच खिडक्या, दरवाज्यांमधून डास शिरतात आणि चावतात. जसजसं वातावरण थंड होत जातं तसतसं डासांचा प्रमाण वाढतं. खिडक्या उघडताच खूप डास घरात येतात. (Mosquito Repellent) अशात डास चावू नये म्हणून काही घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. जेणेकरून घरात डास येणार नाहीत आणि चावणार नाहीत. (Mosquito home remedies and how to make mosquito repellent at home)
लसणाचा रस
लसणात असलेले सल्फर आणि त्याचा वास डासांना घालवण्याचे काम करते. यासोबतच डासांनी लसणाचा रस प्यायल्यास त्यांचा मृत्यूही होऊ शकतो.
लसणात असलेले सल्फर आणि त्याचा वास डासांना घालवण्याचे काम करते. यासोबतच डासांनी लसणाचा रस प्यायल्यास त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. तुम्हाला फक्त लसणाच्या काही पाकळ्या बारीक कराव्या लागतील आणि त्या पाण्यात उकळाव्या लागतील. आता हे पाणी थंड झाल्यावर एका स्प्रे बाटलीत भरून घरभर शिंपडा. डास दिसणार नाहीत.
कापूर
डासांना दूर करण्यासाठी कापूर देखील कमी प्रभावी नाही. याचा वापर करण्यासाठी घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद करून कापूर जाळावा. तुम्हाला दिसेल की अर्ध्या तासात सर्व डास नाहीसे होतील
याशिवाय कापूर पाण्यातही ठेवता येतो ज्यामुळे खोलीत त्याचा सुगंध पसरतो. लहान मुले किंवा पाळीव प्राणी कापरापासून दूर राहिले पाहिजेत
पुदिना
पुदिन्याची चटणी अनेकांची फेव्हरेट आहे. पण पुदिन्याची पानं डास दूर पळवण्यात तितकीच फायदेशीर ठरू शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक मॉक्सिटो रेपेलंट्समध्ये पुदीना असतो. पुदिन्याची पानं घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा. तुम्ही पुदिन्याचं तेलही घरात शिंपडू शकता यामुळे डास मरण्यास मदत होते.
वनस्पती
काही वनस्पतींचा वास डासांना दूर ठेवण्याचे काम करतो. तुम्ही तुमच्या घरात रोझमेरी, बेझेल आणि पुदिना लावू शकता. या गोष्टी स्वयंपाकातही वापरता येतात आणि तुम्ही या वनस्पतींची सुकी पाने इकडे-तिकडे घरात ठेवू शकता.
लिंबू आणि लवंग
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लिंबाचे २ तुकडे करून त्यात लवंग ठेवाव्या लागतील. डासांना लिंबाचा आणि लवंगाचा सुगंध अजिबात आवडत नाही आणि ते त्यापासून दूर पळतात.