navaratri akhand diya, how to remove kajali or blackness from cotton wicks in akhand diya
नवरात्री विशेष: वातीभोवती आलेली काजळी कशी काढावी? १ सोपा उपाय- दिवा अजिबात विझणार नाहीPublished:October 2, 2024 03:54 PM2024-10-02T15:54:46+5:302024-10-02T16:01:27+5:30Join usJoin usNext नवरात्रोत्सवाला आता मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे (Navratri 2024). नवरात्रीच्या काळात बहुतांश घरांमध्ये अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे. अखंड दिवा लावल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की काही तासांमध्येच दिव्याभोवती काजळी तयार होते. अनेक जणींचा असा अनुभव असतो की दिव्याभोवतीची काजळी काढायला गेलं की दिवा विझतो. आता नवरात्रीचा अखंड दिवा अशा पद्धतीने विझला तर अनेक जणी लगेचच मनातून खट्टू होतात. त्यात एवढं मनाला लागून घेण्यासारखं काही नसतं. पण अनेकींना दिवा काही क्षणांसाठी विझणंही चालत नाही. म्हणूनच वातीभोवती काजळी आली असेल तर ती काढून घेण्यासाठी ही एक खास ट्रिक वापरा. वातीभोवती आलेली काजळी काढण्यासाठी भुवयांसाठी असणारे प्लकर खूप उपयुक्त ठरते. १०- २० रुपयांना ते बाजारात मिळते. ते प्लकर घ्या आणि त्याने अलगद वातीचा एक छोटासा भाग पकडून वर खेचा. वात वर ओढताना प्लकरने वातीच्या मधोमध पकडू नका. अगदी बाजुचा छोटासा भाग पकडा. यामुळे अलगद वात वर ओढली जाईल. त्यानंतर वातीच्या आजुबाजुला जी काजळी असेल ती प्लकरच्या मदतीनेच अलगद काढून टाका. दिवा अजिबात विझणार नाही.टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४सोशल व्हायरलNavratri Mahotsav 2024Social Viral