नवरात्री विशेष: वातीभोवती आलेली काजळी कशी काढावी? १ सोपा उपाय- दिवा अजिबात विझणार नाही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2024 3:54 PM 1 / 6नवरात्रोत्सवाला आता मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे (Navratri 2024). नवरात्रीच्या काळात बहुतांश घरांमध्ये अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे.2 / 6अखंड दिवा लावल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की काही तासांमध्येच दिव्याभोवती काजळी तयार होते. अनेक जणींचा असा अनुभव असतो की दिव्याभोवतीची काजळी काढायला गेलं की दिवा विझतो.3 / 6आता नवरात्रीचा अखंड दिवा अशा पद्धतीने विझला तर अनेक जणी लगेचच मनातून खट्टू होतात. त्यात एवढं मनाला लागून घेण्यासारखं काही नसतं. पण अनेकींना दिवा काही क्षणांसाठी विझणंही चालत नाही.4 / 6म्हणूनच वातीभोवती काजळी आली असेल तर ती काढून घेण्यासाठी ही एक खास ट्रिक वापरा.5 / 6वातीभोवती आलेली काजळी काढण्यासाठी भुवयांसाठी असणारे प्लकर खूप उपयुक्त ठरते. १०- २० रुपयांना ते बाजारात मिळते. ते प्लकर घ्या आणि त्याने अलगद वातीचा एक छोटासा भाग पकडून वर खेचा.6 / 6वात वर ओढताना प्लकरने वातीच्या मधोमध पकडू नका. अगदी बाजुचा छोटासा भाग पकडा. यामुळे अलगद वात वर ओढली जाईल. त्यानंतर वातीच्या आजुबाजुला जी काजळी असेल ती प्लकरच्या मदतीनेच अलगद काढून टाका. दिवा अजिबात विझणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications