नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

Published:September 29, 2022 02:51 PM2022-09-29T14:51:29+5:302022-09-29T15:01:34+5:30

नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

१. महालक्ष्मीचे ३ दिवस आणि नवरात्रीचे ९ दिवस नेहमीच्या रांगोळीसोबत किंवा मग देवघरासमोर देवीची छोटीशी, नाजूक पाऊलं आवर्जून काढली जातात. एकच एक पद्धतीने पाऊलं काढण्यापेक्षा दररोज नव्या डिझाइनची पाऊलं काढा. ही सगळी पाऊलं अगदी सोपी आणि चटकन काढता येण्यासारखी असून ती इन्स्टाग्रामच्या _.sneh_art._ या पेजवर शेअर करण्यात आली आहेत.

नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

२. नवरात्रीमध्ये ज्या दिवशी जो रंग सांगितला आहे, तो रांगोळीतला रंग वापरून पाऊलं काढण्यास आणखी छान वाटेल. हे एक सोपे डिझाइन वर मोठा गोल आणि त्याला चिटकूनच छोटा गोल काढा आणि त्यावर ठिपके देऊन बोटं काढा.

नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

३. हे तर आणखीनच सोपे आणि अगदी चटकन होणारे डिझाइन. पण यामध्ये पाऊलांचा आकार परफेक्ट जमायला हवा. एक- दोन वेळा सराव केल्यावर हमखास जमेलच, असा तो आकार आहे.

नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

४. एक मोठा गोल आणि त्याला जोडूनच हा खालचा आकार काढला की झाले पाऊल तयार. बोटांच्या जागेवर नाजूक ठिपके देऊन एखाद्या काडीने ते वर दाखविल्याप्रमाणे पसरवून घ्या.

नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

५. हे डिझाइन काढण्यासाठी एक फुली काढा. त्याची वरची आणि खालची बाजू आडवी रेघ मारून जोडून घ्या. त्यावर नाजूक बोटं काढा..

नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

६. हा एक आकार देखील सोपा आहे. शिवाय अगदी पटकन होण्यासारखा आहे.

नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

७. उलट्या पद्धतीने कोयरी किंवा कुयरीचे डिझाईन काढून हा अकार काढता येतो. हे थोडेसे नजाकतीने काढावे लागणार, एवढं मात्र नक्की.

नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

८. रांगोळीचे दोन जाडसर ठिपके द्या. वरचा मोठा तर खालचा लहान असावा. त्या ठिपक्यांच्या मधोमध बोटाने गोलाकार करा. वरच्या बाजूने बोटांचा आकार करावा.

नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन

९. एक आडवी रेघ मारून तिला जोडून वर दाखविल्याप्रमाणे आकार काढावा आणि वर बोटांचे ठिपके द्यावेत.