Join us   

नैवेद्याच्या-जेवणाच्या ताटापुढे काढा सुबक रांगोळी; पाहा सोप्या-सुंदर डिझाईन्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2024 9:52 AM

1 / 7
नवरात्रीत आपण देवीला रोज नैवेद्य दाखवतो. त्याशिवाय कुमारीका, सवाष्णी यांनाही जेवायला बोलावतो. अशावेळी नैवेद्याचे किंवा जेवणाच्या ताटापुढे आवर्जून रांगोळी काढली जाते. ही रांगोळी झटपट आणि तितकीच सुंदर काढता यावी यासाठी काही सोप्या डिझाईन्स पाहूया (Navratri special rangoli designs around plate)...
2 / 7
ताटाच्या भोवती अर्धगोल आणि त्यानंतर आपल्या आवडीच्या रंगाचे बिंदू देऊन वेगवेगळ्या प्रकारे अशी रांगोळी काढता येऊ शकते. ही रांगोळी दिसायला सुंदर दिसते आणि काढूनही झटपट होते.
3 / 7
जास्त कलाकुसर न करता उठून दिसेल अशी रांगोळी. बिंदू काढून ते एकसारखे स्प्रेड केले की अशी छान डिझाईन तयार होते. अगदी पान वाढून झाल्यावरही ही रांगोळी काढून होते.
4 / 7
ताटाभोवती नुसते एका बाजूला एक चक्र काढले आणि त्याला थोडे सजवले तरी छान दिसते. यावर थोडे रंग भुरभुरले तर रांगोळीची शोभा आणखी खुलते.
5 / 7
हातात थोडा वेळ असेल आणि कलाकुसर करायला जागा असेल तर अशाप्रकारे छानशी रंगबिरंगी फुला-पानांची रांगोळी नैवेद्याच्या ताटाची शोभा वाढवणारी ठरते.
6 / 7
अगदी सोपी-साधी तरीही दिसायला पारंपरिक अशी ही रांगोळी काढणं नाजूक हातांचं काम असतं. मन लावून ती काढली तर ती फारच सुरेख दिसते.
7 / 7
पानावर लोकं बसल्यावरही झटपट काढून होतील अशी ही फुलं आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान-मोठ्या आकारात, वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो. यावर नुसतं हळदी-कुंकू वाहिलं तरी छान दिसतं.
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२४रांगोळीनवरात्री