नवरात्र विशेष: ९ दिवस काढा लक्ष्मीच्या पाऊलांच्या सोप्या रांगोळ्या, ५ मिनिटांत काढून होतील डिजाईन्स
Updated:October 1, 2024 21:33 IST2024-10-01T21:21:51+5:302024-10-01T21:33:18+5:30
Navratri Special Rangoli Designs : तुम्ही पांढऱ्या रांगोळीने लक्ष्मीची पाऊलं काढून त्यावर हळद आणि कुंकू घालू शकता.

भारतीय संस्कृतीत रांगोळीचे खास महत्व आहे. नवरात्रीच्या सणात ९ दिवस दारासमोर किंवा देव्हाऱ्याच्या समोर रांगोळ्या काढल्या तर प्रसन्न वाटतं आणि घरातील वातावरणही चांगलं राहतं. (Navratri Laxmi Rangoli Easy Designs)
नवरात्रीच्या ९ दिवसांत काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिजाईन्स पाहूया. लक्ष्मीच्या पाऊलांच्या डिजाईन्स काढण्यासाठी तुम्हाला कमीत कमी ५ मिनिटं लागतील.
तुम्ही पांढऱ्या रांगोळीने लक्ष्मीची पाऊलं काढून त्यावर हळद आणि कुंकू घालू शकता.
नाणे, सुपाऱ्या, चमचा या ३ वस्तूंचा वापर करून तुम्ही सुंदर सोपी रांगोळी काढू शकतात.
तुम्हाला रांगोळीच्या दुकानात लक्ष्मीच्या पाऊलांचे रेमिडेड ठसे सहज मिळतील आणि त्यामुळे दारही उठून दिसेल.
रांगोळी काढताना तुम्ही आधी खडूनं आकृती काढू शकता त्यानंतर रांगोळीत विविध रंग भरा.
याशिवाय तुम्ही कळस आणि नारळ याची सोपी आकृती काढून रांगोळी काढू शकता.
रांगोळ्या काढण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. पट्ट्यांच्या रांगोळ्यांची डिजाईन तुम्ही काढू शकता.
(Image Credit- Social Media)