ना ओव्हर रिॲक्ट करते ना ओव्हर इमोशनल होते, प्रीती झिंटाची ipl कमाल आणि धमाल..
Updated:April 6, 2025 13:00 IST2025-04-06T12:54:25+5:302025-04-06T13:00:41+5:30
Neither overreacting nor overemotional, Preity Zinta is an amazing team owner : प्रत्येक सामन्यामध्ये आनंदीच दिसते प्रिती. शांतपणे खेळाची मज्जा घेते.

भारतामध्ये आयपीएल प्रचंड लोकप्रिय आहे. तो लोकांसाठी फक्त खेळ उरलेला नाही. तर पॅशन झाले आहे. आयपील सिरीज एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते, असे म्हणायला हरकत नाही.
पण आयपीएल मध्ये फक्त सामने होतात असे नाही. वादविवाद, भांडणे, ड्रामा, रडारड सगळेच प्रकार होत असतात. खेळाडूंप्रमाणेच सर्व संघांचे मालक व मालकीण कायम चर्चेत असतात. कॉमेरा सारखा त्यांच्या दिशेने वळवला जातो.
काही संघ मालक व मालकीण त्यांच्या विचित्र वागणे, प्रतिक्रिया , संताप यांचे मिम मटेरियल होऊन जातात. सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल होतात. काही ढसाढसा रडताना दिसतात तर काही अतिच उत्साहात उड्या मारत असतात.
१० संघांचे १० मालक प्रत्येकाची वागण्याची पद्धत वेगळीच. मात्र एक मालकीण अशीही आहे जी शांत बसून क्रिकेटच्या सामन्यांचा आस्वाद लुटताना दिसते. ना हारल्यावर रडताना दिसत ना जिंकल्यावर उड्या मारताना दिसते.
प्रीती झिंटा एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री तर आहेच, मात्र एक उत्तम संघ मालकीणही आहे. हे ती सातत्याने सिद्ध करत असते. पंजाब सुपर किंग्स या संघाची ती मालकीण असून तिचे संघातील खेळाडूंशी नातेही फार आपुलकीचे आहे.
संघातील खेळाडूंना स्वत:च्या हाताने आलू पराठे तयार करून खायला घातल्याचा किस्साही प्रितीने सांगितला होता. तिने जवळपास १०० पराठे तयार केले होते. सर्व खेळाडूंनी मनसोक्त पराठे खाल्ले.
प्रिती प्रत्येक सामन्या वेळी संयम ठेऊन सामना पाहत असते. प्रत्येक वर्षी ती तशीच हसतमुख राहून सिरीजमध्ये मालकीणीची भूमिका बजावताना दिसते.
सामना हारल्यावर इतर मालक खेळाडूंवर ओरडतानाचे व्हिडिओ तर आपण पाहिलेच आहेत. मात्र प्रिती सामना हारल्यावरही टाळ्या वाजवून खेळाडूंचे कौतुक करतानाच दिसते.