डिंपल कपाडिया आजी दिसत नाही, पण त्यांच्या नातीची मात्र व्हायरल चर्चा! राजेश खन्नाचा वारसा ‘ती’ चालवेल?
Updated:April 9, 2025 22:26 IST2025-04-09T22:11:43+5:302025-04-09T22:26:47+5:30
Netizens Are Amazed To See The Beauty of Rajesh Khanna’s Granddaughter Naomika Saran : Who is Naomika Saran? Meet Dimple Kapadia’s glamorous granddaughter and Bollywood’s new star kid : Rajesh Khanna's granddaughter Naomika Saran arrived with grandma Dimple Kapadia at a recent event in Mumbai : राजेश खन्ना यांची नात नुकतीच पहिल्यांदा मिडियासमोर आली, तिची एक झलक पाहून नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण..

राजेश खन्ना एकेकाळचा सुपरस्टार. आणि डिंपल कपाडियाही. त्यांची लव्हस्टोरी मग वेगळं होणं हे सारंच एकेकाळी गाजलं. आणि काळ बदलता बदलता आता चर्चा आहे त्यांच्या नातीची. अतिशय देखणी ही मुलगी, अनेकांना तिच्यात राजेश खन्नाची झलक दिसली. तिचे फोटो (Rajesh Khanna's granddaughter Naomika Saran arrived with grandma Dimple Kapadia at a recent event in Mumbai) व्हायरल आहेत.
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची नात. नाओमिका सरन सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिचे फोटो व्हायरल आहेत. तिचा सिनेमाही येणार असल्याचे समजते.
ही नाओमिका म्हणजे अक्षय कुमारची मेहुणी आणि ट्विंकल खन्नाची बहिण रिंकी खन्ना हीची मुलगी.
रिंकीचं फिल्मी करिअर जेमतेम होतं. ट्विंकलचंही तेच. पण आता रिंकीची लेक मात्र हिंदी सिनेमात काम करायला आतूर दिसते. मॅडॉक फिल्मच्या विसाव्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित पार्टीला तिने आजी डिंपलसोबत उपस्थितीत लावली होती.
या पार्टीतील तिच्या लूक आणि स्टाइलमुळे सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळून होत्या. या पार्टी दरम्यान तिने घातलेल्या काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
रिंकी खन्ना आणि उद्योगपती समीर सरन यांची लेक नाओमिका. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून आता पुढील शिक्षण लंडनमधून घेत आहे.
नाओमिका आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या चर्चा समोर येत आहेत. पिपींग मून डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, प्रोड्युसर दिनेश विजन नाओमिकाला ब्रेक देऊ शकतात.
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्याबरोबर मॅडॉक फिल्म बॅनरखाली तयार होणाऱ्या एका रोमँटिक - कॉमेडी चित्रपटांत नाओमिका बहूतेक काम करणाऱ असल्याची चर्चा आहे.