तन्वी मुंडले आणि कावेरी काकू; दोघी लोकप्रिय होण्याचं सिक्रेट, साड्या आणि सादगीची कमाल.. Published:February 27, 2023 03:58 PM 2023-02-27T15:58:06+5:30 2023-02-27T16:48:38+5:30
Actress tanvi mundle Saree looks : तन्वी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तन्वीचे फोटोशूट देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. काही दिवसांपूर्वी तिनं तिच्या वडीलांसाठी लिहिलेली पोस्ट बरीच चर्चेत होती. टेलिव्हिजनवर सध्या लग्नसराई सुरू आहे. भाग्य दिले तू मला मालिकेत राज आणि कावेरीची लगीन घाई पहायला मिळतेय. 'पाहिले न मी तुला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली तन्वी मुंडले सध्या बरीच चर्चेत आहेत. पहिल्याच मालिकेत तन्वीचं भूमिका आणि भाषेसाठी बरंच कौतुक झालं. तिचे पारंपरीक साडी लूक्स नेहमीच व्हायरल होत असतात. ती अभिनय क्षेत्राकडे कशी वळाली. याबद्दल या लेखात जाणून घेऊया.
तन्वी मूळची कुठली?
तन्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची आहे. 'बाबा वर्धम्’ या नाटकाच्या ग्रुपमधून तिनं अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.
शिक्षण
ती Bsc फिजिक्सची पदवीधर आहे. मातृभाषेवरची उत्तम पकड आणि प्रायोगिक नाट्याची पार्श्वभूमी असणाऱ्या तन्वीला या भूमिकेनं भरभरून ओळख दिली. राज्यनाट्य, युथ फेस्टीवल अशा अनेक स्पर्धेत तिनं काम केलंय. अभिनय शिकण्यासाठी तिनं ललित कला केंद्रात प्रवेश घेतला.
तन्वी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तन्वीचे फोटोशूट देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. काही दिवसांपूर्वी तिनं तिच्या वडीलांसाठी लिहिलेली पोस्ट बरीच चर्चेत होती.
या पोस्टमध्ये तिनं लिहिले की, "माय हिरो, माय बेस्ट फ्रेंड, माय फादर, माय एव्हरीथिंग. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे जे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आज माझ्याकडे बाकी सगळं आहे. फक्त तू नाहीयेस. "तु" हवा होतास. माझा आबू" असं म्हणत तिनं वडीलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
फिटनेस
तन्वीचे गोंडस, सुंदर साडी लूक नेहमीच चर्चेत असतो. एक मुलाखतीदरम्यान ती म्हणाली की, ''मालिका सुरू असताना रोज व्यायाम करणं जमतचं असं नाही. सकाळी-संध्याकाळी किंवा दिवसाआड व्यायाम करते. मालिका करताना योग्य आहाराचं गणित जमवणं अवघड जातं.
मी आता फिटनेसकडे लक्ष देतेय. कलाकारानं फिट असायलाच हवं.''
फॅशनबद्दल तिचं मत काय
तन्वीच्यामते शोभेल आणि ज्यात तुम्ही चांगले दिसाल, अशीच फॅशन असावी. मराठी मुलांच्या फॅशन सेन्सबाबत चर्चा होते. मला वाटतं मराठी मुलीनं काही वेगळं किंवा आव्हानात्मक केलं, तर ते लोकांना का खटकतं? त्यावरून कुणाच्या वैयक्तीक आयुष्यात कुणी ढवळाढवळ करू शकत नाही.’
(Image Credit Social Media/ tanvi mundle- Instagram)
(Image Credit Social Media/ tanvi mundle- Instagram)