Join us   

पणत्या सुंदर रंगवण्याच्या १० आकर्षक आयडिया, पणत्या दिसतील सुंदर- देखण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 11:50 AM

1 / 10
१. गेरुच्या रंगाने रंगविण्यात आलेल्या पणत्या छान दिसतातच. पण त्यांना आणखी सुंदर- देखणं करण्यासाठी आपण त्यांच्यावर छान रंगरंगोटी करू शकताे. त्यासाठीच या बघा काही आकर्षक आयडिया. रंगबेरंगी पणत्यांनी आपली रांगोळी किंवा घराचं अंगण नक्कीच आणखी छान दिसेल.
2 / 10
२. पणत्यांना रंगविण्यासाठी ॲक्रॅलिक रंग किंवा ऑईल पेंटचा वापर करता येतो. पणत्यांना रंग दिल्यामुळे त्यांचं तेल शोषूण घेण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तेलाचीही बचत होते. तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर अशा पद्धतीने पणतीवर बारीक काम करू शकता.
3 / 10
३. पणत्यांवर रंग देऊन झाला की त्यावर असे स्टोन किंवा कुंदन लावू शकता. फक्त वात जिथे लावणार आहोत, तो भाग सोडून कुंदन किंवा स्टोन चिटकवावेत.
4 / 10
४. हे रंगकामही अगदी साधं पण तेवढंच सुंदर आहे. सगळी पणती एकाच रंगाने रंगवायची आणि फक्त तिची वरची बॉर्डर हायलाईट करायची. यासाठी तुम्ही एखाद्या डार्क रंगाचाही वापर करू शकता किंवा अशा पद्धतीने स्टोनही लावू शकता.
5 / 10
५. पणतीच्या वरच्या काठाला बाहेरील बाजूने अशा पद्धतीने मोती लावले तरीही ते खूपच सुंदर आणि आकर्षक दिसेल. यासाठी पण वात जिथे लावणार आहोत, तो भाग सोडून द्यावा.
6 / 10
६. अशा प्रकारच्या चौकोनी पणत्या घेऊनही त्यावर छान रंगकाम करता येईल. पण चौकोनी पणत्या घेतल्या तर त्या पणत्यांमध्ये दोर वातीऐवजी फुलवात लावा.
7 / 10
७. कुंदन, स्टोन, मोती याऐवजी जर अशी वेगवेगळ्या रंगांची लोकर गुंडाळून पणती सजवली, तरीदेखील ती अतिशय देखणी दिसू शकते.
8 / 10
८. हे आणखी एक सुंदर डिझाईन. पणती आहे तशीच गेरू रंगाची राहू द्या. तिच्या मधल्या भागात आणि वरच्या बॉर्डरला फक्त असा वेगळा रंग वापरून रंगकाम करा. एक- दोनच रंग वापरूनही पणती अशी छान दिसू शकते.
9 / 10
९. पणत्यांवर असं फ्लॉवरी डिझाईनही छान दिसतं. त्याच त्या पद्धतीच्या रंगकामापेक्षा हे डिझाईन नक्कीच काहीतरी वेगळं वाटतं.
10 / 10
१०. अशा पद्धतीची सुंदर सजावट करून हे कॉर्नर पीस तुम्ही तुमच्या रांगोळीमध्ये, पुजेसमोर किंवा घराच्या एखाद्या काेपऱ्यामध्ये सजवून ठेवू शकता. पण असं छान पीस तयार करण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ मात्र नक्कीच काढावा लागेल.
टॅग्स : सोशल व्हायरलदिवाळी 2022