1 / 9बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'पंचायत ३' (Panchayat 3) ही वेब सिरीज (Web Series) रिलीज झाल्यापासून अभिषेक त्रिपाठी आणि रिंकी या व्यक्तिरेखांची प्रचंड चर्चा होत आहे (Sanvika). रिंकीची एन्ट्री पहिल्या सिझनमध्ये झाली नाही. मात्र, दुसऱ्या सिझनपासून तिची प्रेक्षकांमध्ये चर्चा होऊ लागली. तर, नुकत्याच रिलीज झालेल्या सिझनमध्ये रिंकीच्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे(Panchayat 3: Who is Rinki aka Sanvika? Know Unknown facts).2 / 9दरम्यान, रिंकी अर्थात सान्विका नक्की कोण कुठली? तिचं अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीचा प्रवास कसा होता? पाहूयात.3 / 9रिंकीचे पात्र साकारणारी अभिनेत्री कोण आहे? हे आता नेटकरी गुगलवर सर्च करू लागले आहे. रिंकीचं पात्र साकारलं आहे ते अभिनेत्री सान्विकाने. सान्विका ही मुळची मध्य प्रदेशमधील जबलपूरची आहे. तिचा जन्म ८ जानेवारी १९९० रोजी झाला. सान्विकाचं खरं नाव पूजा सिंग आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्वप्नपुर्तीकडे वाटचालीस सुरुवात केली. 4 / 9सान्विका लहानपणापासून अभिनेत्री बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून होती. बी. टेकची पदवी घेतल्यानंतर, तिने जॉब करण्यास नकार दिला, आणि अभिनय क्षेत्रात वळली. 5 / 9तिचे आई-वडील तिला अभिनयासाठी मुंबईत जाण्याच्या विरोधात होते. पण आपल्या आई वडिलांशी ती खोटं बोलली. बंगळूरूमध्ये जॉबसाठी जात असल्याचं सांगत, तिने मुंबईची वाट धरली.6 / 9पण मुंबईत आल्यानंतर तिने आई वडिलांना बोलावून घेतले. आपल्या स्वप्नांचे महत्व पटवून दिले. 7 / 9मुंबईत आल्यानंतर एकंदरीत तिचा अभिनयातला प्रवास सोपा नव्हता. तिने खूप स्ट्रगल केलं. त्यानंतर पंचायत या वेब सिरीजमुळे तिला खरी ओळख मिळाली. पण या आधी तिने 'लखन लीला भार्गव' आणि 'हजामत' या वेब शोमध्ये उत्तम व्यक्तिरेखा साकारली. 8 / 9जरी तिची पंचायतमधली व्यक्तिरेखा साधी आणि सरळ असली, तरी खऱ्या आयुष्यात ती बोल्ड अँड ब्युटीफूल आहे. 9 / 9सान्विका सोशल मीडियात फार सक्रीय असते. तिने आपले ग्लॅमरस आणि सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.