प्रियांका ते कतरिना कैफ, कुणाची एंगेजमेंट रिंग सगळ्यात महागडी? कोटीकोटींच्या अंगठ्या, पाहा फोटो.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 5:53 PM 1 / 10प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास यांनीही लग्नगाठ बांधली आहे. हे दोघेही वेगवेगळ्या गोष्टींवरुन कायम चर्चेत असतात. ज्याठिकाणहून निकने प्रियांकासाठी अंगठी घेतली त्यांनी सांगितले की ही अंगठी २ लाख डॉलर्स म्हणजे जवळपास १.५ कोटीच्या जवळपास आहे. यामध्ये नुसता एक चौकोनी खडा दिसत असला तरी ही अंगठई तिच्या हातात अतिशय छान शोभते.2 / 10विराट कोहली आणि अनुष्का शर्मा म्हणजेच विरुष्का यांची जोडी एक रोमँटीक कपल मानले जाते. नुकतीच त्यांना मुलगी झाली असून दोघेही तिच्यासोबत बिझी आहेत. यांचाही विवाह सोहळा इटलीमध्ये पार पडला होता. अनुष्काची रिंग काहीशी मोठी असल्याचे पाहायला मिळाले होते. या रिंगची किंमत अंदाजे १ कोटीच्या घरात आहे. 3 / 10दिपिका आणि रणवीर सिंग यांचे २०१८ मध्ये इटली येथे लग्न झाले. रणवीर सिंग याने दिपिकाच्या हातात घातलेली अंगठी प्लॅटीनमची असून ती अतिशय सुंदर अशी खड्याची आहे. या अंगठीची किंमत १.३ कोटी ते २.७ कोटी दरम्यान आहे. 4 / 10शिल्पा शेट्टी ज्याप्रमाणे एव्हरग्रीन आणि शायनिंग आहे त्याचप्रमाणे तिची एंगेजमेंट रींगही आहे. प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या राज कुंद्राने शिल्पाच्या बोटात २० कॅरेटची ३ कोटी किमतीची रिंग घातली होती. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये शिल्पाच्या हातातील ही रिंग आपल्याला दिसते. 5 / 10सोनम एक स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोनमने लग्नात घातलेले दागिने, कपडे आणि मंगळसूत्र या सगळ्याचीच चर्चा झाली होती. याबरोबरच तिने घातलेल्या अंगठीचीही चर्चा झाली होती. आनंद आहुजा याने सोनमच्या हातात घातलेली अंगठी उपस्थितांच्या चर्चेचा विषय बनली होती. या अंगठीची किंमत ९० लाख रुपये आहे. 6 / 10ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील लग्नाला इतके वर्ष होऊनही त्यांच्यातील नाते आजही तितकेच छान आहे. जगातील सर्वात व्यक्तींपैकी एक मानल्या जाणाऱ्या ऐश्वर्याचे सौंदर्य आजही अनेकांना घायाळ करते. अभिषेकने तिच्या या सौंदर्याला खुलेल अशी एक सुंदर अंगठी ऐश्वर्याला घातली होती. खड्याच्या या अंगठीची किंमत होती ५० लाख रुपये.7 / 10करीना म्हणजेच आपल्या बेबोने २०१२ मध्ये सैफ अली खानशी लग्न करत पतौडी घराण्याची ती बेगम झाली. नवाबने आपल्या या बेगमसाठी थोडीथोडकी नाही तब्बल ७५ लाखांची अंगठी खरेदी केली. या सुंदर अंगठीवरुन बेबोवर सैफ अली खानचे किती प्रेम आहे हेच दिसून येते. 8 / 10अभिनेत्री जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची लव्हस्टोरी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आणि छान अशी लव्हस्टोरी मानली जाते. दोन मुले झाल्यानंतरही या दोघांमधील प्रेम तितकेच घट्ट आणि कायम आहे. क्यूट अशा जेनेलियाच्या बोटात खुलून दिसे अशी अतिशय सुंदर अंगठी रितेशने १४ कॅरटच्या डायमंडमध्ये केलेली आहे. या अंगठीची किंमत ५० लाखांच्या घरात आहे. 9 / 10दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री असिन हिच्या हातातील मोठीच्या मोठी अंगठी कायमच सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. २०१६ मध्ये राहुल शर्माशी लग्न केल्यानंतर असिन हिने घातलेली खड्याची अंगठी तब्बल ६ कोटींची असून ती बेल्जियम येथून मागवण्यात आली आहे. ही अंगठी या दोघांच्या मित्राने खास तयार केली आहे. या दोघांच्या नावाची पहिली अक्षरे या सुंदर अशा अंगठीवर कोरण्यात आली आहेत. 10 / 10नुकतीच विकी कौशलसोबत लग्न झालेल्या कैतरीना कैफ हिच्या एंगेजमेंट रिंगचीही बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. टिफनी आणि कंपनीने तयार केलेली ही रिंग प्लॅटीनमची असून अतिशय सुंदर अशी डायमंडची आहे. या रिंगची किंमत ७ लाखांच्या घरात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आणखी वाचा Subscribe to Notifications