एक हजारों मे मेरी बहना है! सेलिब्रिटी बहिण भावांची जोडी लयभारी; पाहा कधीही न पाहिलेले फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 3:59 PM 1 / 9रक्षाबंधन हा बहिण भावाच्या नात्यातील प्रेम वाढवणारा सण... आपले आवडते सेलिब्रिटी आणि त्याची भावंडं त्याचं बॉण्डिंग कसं आहे हे जाणून घेण्याचा क्रेझ अनेकांना असतो. म्हणूनच या लेखात लाईम लाईटपासून दूर असलेल्या सेलिब्रिटी बहिण भावांचे फोटोज पाहूया.2 / 9बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याची मोठी बहीण शहनाजबद्दल तुम्हाला माहिती आहे का? शाहरुखची मोठी बहीण शहनाज त्याच्यासोबत राहते पण ती क्वचितच दिसते. शहनाजची तब्येत ठीक नसल्यानं आईच्या निधनानंतर शाहरूख आपल्या बहिणीची पूर्ण काळजी घेतो.3 / 9हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनही बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून दूर राहते. सुनैना तिच्या आई-वडिलांसोबत राहते. सुनैना एक लेखिका असून ती काही काळापासून नैराश्याशी झुंज देत असल्याचे सांगितले जाते. मात्र, सुनैनाची प्रकृती बरी आहे.4 / 9अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश हा पूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचा. आता तो अनुष्का शर्माची प्रोडक्शन कंपनी सांभाळतो. त्यांच्या कंपनीने NH 10 आणि फिल्लौरी सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.5 / 9रणवीर सिंगला तर सगळेच ओळखतात पण त्याची मोठी बहीण रितिका हिला फार कमी लोक ओळखतात. लाइमलाइटपासून दूर राहणारी रितिका रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या लग्नात दिसली होती6 / 9प्रियांका चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री परिणीती चोप्राला शिवांग आणि सहज असे दोन लहान भाऊ आहेत. परिणीती तिच्या भावांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 7 / 9कंगना राणौतचा भाऊ अक्षतचे लग्न झाले आणि त्यामुळे लोकांना तिच्या भावाचीही माहिती झाली. याआधी कंगना राणौतच्या भावाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती. कंगनाने अक्षतच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.8 / 9बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला संपूर्ण जग ओळखते पण तिच्या भावाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ऐश्वर्याचा मोठा भाऊ आदित्य मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो. त्यानं 2009 मध्ये मिसेस इंडिया झालेल्या श्रीमा रायशी लग्न केले आहे.9 / 9बॉलिवूड स्टार अक्षय कुमारची बहीण अलका भाटिया अनेकदा लाइमलाइटपासून दूर असते. अलकाचे लग्न हिरानंदानी ग्रुपचे मालक सुरेंद्र हिरानंदानी यांच्याशी झाले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications