गौरीसमोर काढा आकर्षक रांगोळ्या, झटपट काढता येतील अशा सोप्या डीझाईन्स...
Updated:September 21, 2023 15:12 IST2023-09-21T15:08:26+5:302023-09-21T15:12:21+5:30
Rangoli Designs for Gauri Ganpati festival

गौरीपुढे अनेकदा खूप जागा नसते अशावेळी केवळ बाजुने डीझाईन काढावी लागते त्यासाठी अशी डीझाईन तुम्ही नक्की काढू शकता (Rangoli Designs for Gauri Ganpati festival).
दिसायला सुटसुटीत आणि तरीही आकर्षक अशी रांगोळी काढायची असेल तर थोडी कल्पकता वापरावीच लागते.
गौरी किंवा महालक्ष्मी म्हणजे माहेरवाशिणी. महिलांच्या असलंकारांचे प्रतिक असणारी ही रांगोळी अतिशय सुबक आणि रेखीव दिसते.
कमीत कमी जागेत आकर्षक अशी रांगोळी काढायची असेल तर अशाप्रकारचे पट्टे काढता येतात. यात गणपती आणि लक्ष्मीची पाऊले ही प्रतिकेही दाखवता येतात.
गौराई आल्या सोनपावली असं म्हणत गौराईंचं स्वागत होतं. तशीच रांगोळी त्यांच्या स्वागताला काढली तर...
थोडी कल्पकता आणि पेशन्स असले तर अशाप्रकारे गौरीचा मुखवटा काढता येतो. ही रांगोळी आपण दारात किंवा गौरीसमोर कुठेही काढू शकतो.
साधी तरीही आकर्षक रांगोळी काढायची असेल तर गडद रंगांचा वापर करुन पारंपरीक पद्धतीची अशी पानं, पाऊले, नथ असे आकार काढता येतात.
गौरीपुढे किंवा दारात थोडी जागा असेल तर अशी थोडी पसरट रांगोळी काढता येऊ शकते. यामध्ये आवडीनुसार बदल करता येऊ शकतात.
काढायला फार काही सुचत नसेल तर अशाप्रकारची फुलं एकामागे एक काढली तरी फार सुरेख दिसतात. यांच्या मध्ये मध्ये पाने काढता येऊ शकतात.