गौरीसमोर काढा आकर्षक रांगोळ्या, झटपट काढता येतील अशा सोप्या डीझाईन्स... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 3:08 PM 1 / 9गौरीपुढे अनेकदा खूप जागा नसते अशावेळी केवळ बाजुने डीझाईन काढावी लागते त्यासाठी अशी डीझाईन तुम्ही नक्की काढू शकता (Rangoli Designs for Gauri Ganpati festival). 2 / 9दिसायला सुटसुटीत आणि तरीही आकर्षक अशी रांगोळी काढायची असेल तर थोडी कल्पकता वापरावीच लागते. 3 / 9गौरी किंवा महालक्ष्मी म्हणजे माहेरवाशिणी. महिलांच्या असलंकारांचे प्रतिक असणारी ही रांगोळी अतिशय सुबक आणि रेखीव दिसते. 4 / 9 कमीत कमी जागेत आकर्षक अशी रांगोळी काढायची असेल तर अशाप्रकारचे पट्टे काढता येतात. यात गणपती आणि लक्ष्मीची पाऊले ही प्रतिकेही दाखवता येतात.5 / 9गौराई आल्या सोनपावली असं म्हणत गौराईंचं स्वागत होतं. तशीच रांगोळी त्यांच्या स्वागताला काढली तर...6 / 9थोडी कल्पकता आणि पेशन्स असले तर अशाप्रकारे गौरीचा मुखवटा काढता येतो. ही रांगोळी आपण दारात किंवा गौरीसमोर कुठेही काढू शकतो. 7 / 9साधी तरीही आकर्षक रांगोळी काढायची असेल तर गडद रंगांचा वापर करुन पारंपरीक पद्धतीची अशी पानं, पाऊले, नथ असे आकार काढता येतात. 8 / 9गौरीपुढे किंवा दारात थोडी जागा असेल तर अशी थोडी पसरट रांगोळी काढता येऊ शकते. यामध्ये आवडीनुसार बदल करता येऊ शकतात.9 / 9काढायला फार काही सुचत नसेल तर अशाप्रकारची फुलं एकामागे एक काढली तरी फार सुरेख दिसतात. यांच्या मध्ये मध्ये पाने काढता येऊ शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications