गौरींच्या स्वागताला दारासमोर काढा नाजूक- सुंदर पाऊलं! बघा झटपट पाऊलं काढण्याची युक्ती By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2024 2:20 PM 1 / 9गणरायाचे आगमन झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठच महालक्ष्मीचेही आगमन होते. काही ठिकाणी त्यांना गौरी, ज्येष्ठागौरी असंही म्हणतात. गौरी- गणपतीचा हा सण मोठाचा उत्साहाचा, आनंदाचा असतो.2 / 9महालक्ष्मी किंवा गौरीच्या सणात आपण दारापुढे मोठी रांगोळी तर काढतोच. पण त्याबरोबरच गौरीची नाजूक पाऊलंही घरभर आणि घराच्या मुख्य द्वारापाशी काढली जातात. 3 / 9ती पाऊलं सुबक पद्धतीने कशी काढायची याच्या काही आयडिया पाहिजे असतील तर त्यासाठी या काही छान डिझाईन्स पाहा.4 / 9सगळ्यात सोपी ही एक पद्धत पाहा. अशा प्रकारची पाऊले अगदी झटपट काढून होतील.5 / 9वर सांगितलेल्या पाऊलांमध्ये हळदीचा आणि कुंकवाचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने त्यांना अधिक ठसठशीत करू शकता.6 / 9गौरीची पाऊलं काढण्याची ही आणखी एक सोपी पद्धत बघा. वर मोठा ठिपका आणि खाली छोटा ठिपका. तसेच बोटांचे पाच छोटे- छोटे ठिपके. एवढेच काढले तरी अशी सुरेख पाऊलं तयार होतात. 7 / 9अशा पद्धतीचा पाऊलांचा आकारही खूप आकर्षक वाटतो. अगदी खरं पाऊल ठेवलं आहे, अशा पद्धतीचा भास ही पाऊलं पाहून होतो. 8 / 9गौरीच्या मखरासमोर किंवा घराच्या मुख्य द्वारासमोर रांगोळी काढायची असेल तर अशा पद्धतीची सुंदर रांगोळी तुम्ही काढू शकता.9 / 9घराच्या मुख्य दारापाशी जर गौरीच्या सणादरम्यान रांगोळी काढायची असेल तर हे एक डिझाईन अतिशय सुंदर दिसेल. आणखी वाचा Subscribe to Notifications