लग्न ठरलंय म्हणून स्पेशल केळवण करताय? ८ सुंदर रांगोळ्या काढा-डेकोरेशन दिसेल खास
Updated:April 23, 2025 17:53 IST2025-04-23T17:18:14+5:302025-04-23T17:53:40+5:30

हल्ली कोणताही कार्यक्रम असला तरी त्या थीमनुसार रांगोळ्या काढण्याची पद्धत आहे. म्हणूनच केळवण कार्यक्रमासाठीही अशा काही रांगोेळ्या तुम्ही काढू शकता..
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे घरोघरी केळवण कार्यक्रम असतोच.. अशावेळी अशी एखादी रांगोळी दारासमोर काढली तर ती तुमच्या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढवू शकते..
तुम्ही जर एखाद्या नवरीला केळवणासाठी बोलावणार असाल तर तिच्यासाठी अशी बाहुली ठेवून रांगोळी काढून सजावट करू शकता.
लग्नाप्रमाणेच मौंजीचे मुहूर्तही पुढच्या महिन्यात आहेतच.. त्यामुळे मौंजीच्या केळवणासाठीही या रांगोळ्या उपयुक्त ठरू शकता.
नवरीसाठी केळवण करणार असाल तर अशी एखादी सुंदर रांगोळीही काढता येईल..
या काही रांगोळ्या काढायला सोप्या पण दिसायला अतिशय आकर्षक आहेत.
केळवण कार्यक्रमासाठी हे आणखी एक अतिशय सुंदर आणि देखणं रांगोळी डिझाईन..