‘डीपफेक’ व्हिडिओत रश्मिकाचा चेहरा जिच्या व्हिडिओवर लावण्यात आला ‘ती’ मुलगी कोण? नक्की करते काय? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 4:48 PM 1 / 8दाक्षिणात्य अभिनेत्री पुष्पा गर्ल रश्मिका मंदाना आपल्या निरागस अभिनयासाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मात्र, सध्या ती एका बोल्ड व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. पण या व्हिडिओत रश्मिका नसून, दुसरीच मुलगी आहे, व तिच्या व्हिडिओवर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. या डीपफेक व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे(Rashmika Mandanna's deepfake video goes viral).2 / 8खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवर याबाबत अलर्ट जारी केला होता. त्यावर रश्मिकानेही प्रतिक्रिया दिली. मात्र, या व्हिडिओत असणारी ती मुलगी कोण? तिची एवढी चर्चा का?3 / 8व्हिडिओमध्ये असणाऱ्या तरुणीच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. त्या तरुणीचं नाव झारा पटेल असून, ती ब्रिटिश सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती आपल्या एक्स रेटेड पोस्टसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या अकाउंटवर झाराने अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ज्यात ती बोल्ड अवतारात दिसते. 4 / 8इन्स्टाग्रामवर झाराचे ४ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. झारा एक फुल टाइम डेटा इंजिनिअर आहे. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्ससाठी अडल्ट कंटेंट तयार करण्यासाठी ती प्रसिध्द आहे. झारा आपल्या सोशल मिडीयावर अनेक बोल्ड व्हिडिओ आणि फोटो शेअर करते. तिने व्हायरल झालेला व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवर ९ ऑक्टोबर रोजी शेअर केला होता. 5 / 8व्हायरल व्हिडिओमध्ये ती काळ्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे. मात्र, यात झाराचा चेहरा मॉर्फ करण्यात आला असून, यात तिच्या चेहऱ्याच्या जागी रश्मिका मंदानाचा चेहरा लावण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये झारा लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तिने रश्मिकाचा चेहरा मॉर्फ केल्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.6 / 8झारा म्हणते, 'मी पाहिलं माझ्या व्हिडिओवर बॉलीवूड अभिनेत्रीचा चेहरा लावण्यात आला आहे. जे काही घडलंय त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. मला त्या महिला आणि मुलींची काळजी वाटते ज्यांना स्वत:चे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची जास्तच भीती वाटते.'7 / 8डीपफेक तंत्रज्ञान एखाद्या व्यक्तीचा खोटा व्हिडिओ तयार करू शकते. यामध्ये केवळ त्या व्यक्तीचा चेहराच नाही, तर त्याचा आवाज, हावभाव, बोलताना होणारी ओठांची हालचाल, डोळ्यांचे भाव आणि इतर गोष्टी देखील कॉपी करता येऊ शकते. यापूर्वी कित्येक वेळा मोठमोठ्या नेत्यांचे किंवा सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत.8 / 8व्हायरल झालेल्या व्हिडिओवर रश्मिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत भावना व्यक्त केली आहे. त्यात तिने म्हटले की, 'माझा डीपफेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हे पाहून मला खूप दुःख झाले. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते. कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत. पण हे मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना घडलं असतं. तर, मी हे कसं हाताळलं असतं, याची मला कल्पनाही करवत नाही.” आणखी वाचा Subscribe to Notifications