1 / 10एखादी नवीन गोष्ट शिकणे गरजेचे असते. पण ती लक्षात ठेवणेही तितकेच गरजेचे असते. बरेचदा आपण शिकलेल्या गोष्टी विसरून जातो.2 / 10एखादी गोष्ट शिकल्यावर तिचा विसर पडू नये यासाठी काही जपानी ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही जे काही शिकत आहात ते शिका. अजिबात विसरणार नाही.(Source: India Today) 3 / 10या ७ जपानी संकल्पना समजून घ्या आणि त्यांचा वापर करून बघा. शिकण्यातील रुचिही वाढेल.4 / 10१. कायझेन ही जपानी संकल्पना आहे. त्याचा अर्थ सतत काही ना काही बदल करत राहा असा आहे. नवीन काही तर शिकत राहा. जे ज्ञान तुम्हाला आधीपासून आहे त्यामध्ये सातत्याने भर घालत राहा. 5 / 10२. एखादी गोष्ट भलेही तुम्हाला आधीपासून माहिती असेल. तरी पुन्हा तिचे आकलन करा. काही वाचत असाल तर ते परत परत वाचा. असं केल्याने बौद्धिक क्षमता वाढते.6 / 10३. काहीही शिकताना ते प्रात्यक्षिकांद्वारा शिका. ही फारच प्रभावशाली पद्धत असते. कृती केल्यावर संकल्पना जास्त चांगल्या समजून घेता येतात.7 / 10४. जे शिकला आहात ते सतत आठवणीमध्ये ठेवा. असं केल्याने ती गोष्ट डोक्यात अगदी फीट बसते. विसरायला होत नाही.8 / 10५. एखादी गोष्ट शिकताना त्याची प्रतिमा डोळ्यासमोर तयार करायची. वस्तूंचा विचार करताना त्यांची प्रतिमा लगेचच डोक्यामध्ये यायला हवी. असं केल्याने शिकण्याची प्रक्रिया प्रभावी होते.9 / 10६. तुम्ही ज्या विविध गोष्टी शिकता त्यांचा एकमेकांशी संबंध लागतो का हे पडताळून पाहायचे. डोक्यामधील विविध माहिती एकत्र करून त्याचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न करायचा. 10 / 10७. एखादी गोष्ट तुम्ही पूर्णपणे शिकल्यावर ती दुसर्यांना शिकवायची. असं केल्याने समोरचाही शिकतो आणि आपलाही सराव होतो. नीट शिकवता आले म्हणजे आपण त्या बाबतीतील सुज्ञानी आहोत असा त्याचा अर्थ होतो.