Join us   

सलमान खानची ऑफर नाकारली, व्हायचं होतं मानसशास्त्रज्ञ पण..!श्रद्धा कपूरचीच सध्या चर्चा कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 4:59 PM

1 / 10
बॉलीवूडची 'स्त्री' (Stree 2) अर्थात श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) चाहतावर्ग हा सातासमुद्रापार पोहचला आहे. तिची दिलखेचक अदा आणि कोणीही भाळेल असं तिचं डोळ्यात न मावणारं सौंदर्य आहे (Bollywood). घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या श्रद्धाला सिनेसृष्टीत बराच स्ट्रगल करावा लागला होता. तिने अॅक्टिंगसाठी शिक्षण सोडल्याचंही बोललं जातं. श्रद्धा कपूरचा स्ट्रगलमधला काळ नक्की कसा होता? तिला प्रसिद्धी कशी मिळाली? पाहूयात('Rejected Salman Khan-starrer To Focus On Studies': Shraddha Kapoor).
2 / 10
नुकताच स्त्री २ सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. तिने या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरंच स्ट्रगल केलं. तिची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ नेहमी चर्चेत राहिली आहे.
3 / 10
श्रद्धाचं जन्म ३ मार्च १९८७ रोजी मुंबईत झाला. तिच्या वडिलांचे नाव शक्ती कपूर. श्रद्धाच्या वडिलांनी सिनेसृष्टीत उत्तम कामगिरी केली. त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. श्रद्धाच्या आईचं नाव शिवांगी कपूर आहे. ती देखील व्यवसायाने अभिनेत्री आहे.
4 / 10
श्रद्धाला 'सिद्धांत कपूर' नावाचा मोठा भाऊ आहे. तसेच प्रख्यात अभिनेत्री 'पद्मिनी कोल्हापुरे' आणि 'तेजस्विनी कोल्हापुरे' तिच्या मावशी आहे. श्रद्धाने तिच्या आजोबा आणि आईकडून गाण्याचे शिक्षण घेतले आहे. तिला पुढे जाऊन गाण्यात करिअर करायचे होते. श्रद्धाची कौटूंबिक पार्श्वभूमी पंजाबी-मराठी अशी आहे, कारण ती तिच्या वडिलांकडून पंजाबी आहे आणि आईच्या बाजूने मराठी आहे.
5 / 10
श्रद्धा कपूरने 'जमनाबाई नरसी स्कूल'मधून शालेय शिक्षण घेतले आहे. वयाच्या १५ व्या वर्षी तिने 'अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे'मध्ये प्रवेश घेतला. या शाळेत श्रद्धा अभिनेत्री अथिया शेट्टी आणि अभिनेता टायगर श्रॉफनेसुद्धा शिक्षण घेतले आहे.
6 / 10
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अॅडव्हर्टायझिंग स्ट्रीममध्ये पदवी मिळवण्यासाठी ती अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात गेली. पण अभिनय क्षेत्रातील आवडीवमुळे तिने ते शिक्षण अर्ध्यावरच सोडले.
7 / 10
शालेय शिक्षण घेत असताना श्रद्धाने अनेक डान्स प्रोग्राममध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी सलमानने तिचे एक नाटक पाहिले होते. तिचा नाटकातला अभिनय पाहून, तिला सलमानकडून लकी: नो टाईम फॉर लव्ह या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. पण तिने हा प्रस्ताव नाकारला. कारण तिला मानसशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा होती.
8 / 10
त्यानंतर तिने बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये मुख्य विषय मानसशास्त्र घेतला. यादरम्यान, अंबिका हिंदुजा यांनी तिचं फेसबुक प्रोफाईल पाहिलं. तेव्हा त्यांनी तिला तीन पत्ती या चित्रपटातील भूमिकेसाठी कास्ट केलं. या चित्रपटासाठी तिने शिक्षण सोडलं असल्याचं बोललं जातं. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन, बेन किंग्सले आणि आर माधवन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली.
9 / 10
यानंतर श्रद्धा कपूरने यशराज फिल्म्ससोबत तीन चित्रपटांचा करार केला आणि २०११ मध्ये तिने 'लव्ह का द एंड' या कॉमेडी चित्रपटात काम केले. ह्या चित्रपटाने तिच्या पहिल्या चित्रपटापेक्षा चांगली कामगिरी केली. पण तिला खरी ओळख आशिकी २ या चित्रपटामुळे मिळाली. त्यांनतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही.
10 / 10
चित्रपटांमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त श्रद्धाने विविध फॅशन डिझायनर्ससाठी लॅक्मे फॅशन वीक मध्ये रॅम्प वॉक केला आहे. ती लॅक्मे, वीट, लिप्टन, मॅरिकोज हेअर अँड केअर आणि इतर अनेक उत्पादनांची ती ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तिचा इन्स्टाग्रामवर चाहतावर्गही मोठा आहे. श्रद्धाचे ९१. ४ दशलक्ष फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिने मागे टाकलं आहे. कारण मोदींचे ९१. ४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
टॅग्स : श्रद्धा कपूरबॉलिवूडसोशल मीडिया