रेखा.. जब से तुम्हे देखा! अलौकिक सौंदर्याचं मूर्तीमंत रुप, सत्तरीतही उमराव जानची अदा बेमिसाल!

Updated:March 25, 2025 19:19 IST2025-03-25T17:44:01+5:302025-03-25T19:19:41+5:30

Rekha Turns Umrao Jaan Once Again At The Age of 70, Stunned Her Fans In A Bright Pink Anarkali With Heavy Jwelery : वयाच्या सत्तरीत रेखा यांनी केला ४४ वर्षांपूर्वीच्या उमराव जानचा लूक रिक्रिएट...

रेखा.. जब से तुम्हे देखा! अलौकिक सौंदर्याचं मूर्तीमंत रुप, सत्तरीतही उमराव जानची अदा बेमिसाल!

Majestic, radiant and stunning Rekha ji. Every frame reflects her unmatched aura. असं म्हणत बॉलिवूड फोटोग्राफर डब्बू रतनानीने रेखाचे फोटो शेअर केले आणि प्रश्न पडला की कोण म्हणेल रेखाने सत्तरी ओलांडली आहे.

रेखा.. जब से तुम्हे देखा! अलौकिक सौंदर्याचं मूर्तीमंत रुप, सत्तरीतही उमराव जानची अदा बेमिसाल!

स्वत:ला अंर्तबाह्य बदलून टाकायचं असेल तर ते काम किती ग्रेसफुली करता येतं आणि ते सौंदर्य कसं जगणं उजळून टाकतं त्याचं उदाहरण म्हणजे रेखा.

रेखा.. जब से तुम्हे देखा! अलौकिक सौंदर्याचं मूर्तीमंत रुप, सत्तरीतही उमराव जानची अदा बेमिसाल!

हिंदी सिनेमे गाजवले, स्त्री केंद्री भुमिका केल्या आणि आपला सुपरस्टार असण्याचा आब राखत आपलं खासगीपणही त्यांनी राखलं. जे सोपं नव्हतंच.

रेखा.. जब से तुम्हे देखा! अलौकिक सौंदर्याचं मूर्तीमंत रुप, सत्तरीतही उमराव जानची अदा बेमिसाल!

त्यांच्या खासगी जगण्याविषयी, प्रेमात आकंठ बुडण्याविषयी चर्चा तर नेहमीच होते. पण त्या खासगी आणि अत्यंतिक प्रेमाविषयी रेखा ना बोलते ना त्याचे काही भांडवल करते.

रेखा.. जब से तुम्हे देखा! अलौकिक सौंदर्याचं मूर्तीमंत रुप, सत्तरीतही उमराव जानची अदा बेमिसाल!

एकटी बाई अजूनही समाजात अनेकांना बिचारी वाटते, तिनं रडावं कुढावं अशी अपेक्षा असते. रे‌खाने ते सारं मोडीत काढलं आणि सन्मानानं आनंदी जगणं स्वीकारलं.

रेखा.. जब से तुम्हे देखा! अलौकिक सौंदर्याचं मूर्तीमंत रुप, सत्तरीतही उमराव जानची अदा बेमिसाल!

लहानपणापासून सिनेमात काम, अत्यंत कष्ट केले. प्रेम कधी लाभलं नाही की कुटूंब सुख लाभलं नाही. पण ते सारं सोबत घेऊन कुठलाही कडवटपणा न मनात येऊ देता रसरशीत जगणं रेखानं स्वीकारलं.

रेखा.. जब से तुम्हे देखा! अलौकिक सौंदर्याचं मूर्तीमंत रुप, सत्तरीतही उमराव जानची अदा बेमिसाल!

म्हणून रेखा, रेखा आहे. सत्तरी उलटून गेलेली अप्सरा. तिचा डौल, तिचं सजलेलं रुप, तिचं चालणं बोलणं. तिच्यासारखी फक्त तीच!