Sara Ali Khan : सारा खानचा ट्रायल रूम ‘ब्रेन फ्राय’ व्हिडिओ; काही सेकंदातच २० पेक्षा जास्तवेळा बदलले कपडे
Updated:February 28, 2022 12:25 IST2022-02-27T15:45:31+5:302022-02-28T12:25:50+5:30
Sara Ali Khan changing clothes video : सारा अली खानने शेअर केलेल्या व्हिडिओत, तिची स्टायलिस्ट तिला अनेकदा कपडे बदलायला लावते. यानंतर व्हिडिओमध्ये सारा अली खान वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे.

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपले मनमोहक हास्य आणि बबली स्टाईलने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना सारा अली खानचे फोटो आणि व्हिडिओ खूप आवडतात.
सारा तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम पोस्ट देखील करत असते. अशा परिस्थितीत सारा अली खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खान काही सेकंदात वेगवेगळे कपडे ट्राय करताना दिसत आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे.
सारा अली खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की, तिची स्टायलिस्ट तिला अनेकदा कपडे बदलायला लावते. यानंतर व्हिडिओमध्ये सारा अली खान वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे.
व्हिडिओमध्ये साराच्या वेगवेगळ्या शेड्स दिसत आहेत, काही ड्रेसमध्ये खूपच सेक्सी तर काहींमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. साराच्या या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दिली आहे.
सारा अली खान तिच्या शायरींसाठी देखील ओळखली जाते. हा व्हिडिओ शेअर करताना सारा अली खानने ट्राय ट्राय ट्राय... जब तक Brain Fry न हो जाए।' अशी यमक लिहिली आहे.
सारा अली खान अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ वेगवेगळ्या स्टाईलनं शेअर करत असते. साराचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
देसी अवतार असो की बोल्ड स्टाइल, साराची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना आवडते. साराचे इन्स्टाग्रामवर ३९.५ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर ती स्वतः ८५ लोकांना फॉलो करते.
सारा अली खानने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर सारा रणवीर सिंगसोबत सिम्बा चित्रपटात दिसली.
साराचा तिसरा चित्रपट कार्तिक आर्यन सोबत लव आज कल होता. यासोबतच सारा वरुण धवनसोबत कुली नंबर वन या चित्रपटात दिसली होती.
सारा अली खान शेवटची अतरंगी रे या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसले होते.